अवैध मावा-गुटखा विक्रेत्यांवर स्थानिक गुन्हे शाखेचे धडक 6 छापे
एकाच दिवशी 16 जणांवर गुन्हे, 1.37 लाखांचा मुद्देमाल जप्त
अवैध गुटखा आणि सुगंधीत तंबाखू विक्री करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने एकाच दिवशी धडक कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक मा. श्री. मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशान्वये दि. 15/08/2026 रोजी नेवासा, सुपा आणि पारनेर पोलीस स्टेशन हद्दीत 6 ठिकाणी छापे टाकण्यात आले.
पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि संदिप दरवडे, अनंत सालगुडे यांच्यासह 4 पथकांनी ही कारवाई केली.
कारवाईचा तपशील:
छाप्यांमध्ये एकूण 16 आरोपींविरुद्ध 6 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींकडून 1,37,580/- रुपये किमतीचा मावा, पानमसाला आणि सुगंधीत तंबाखूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ठिकाणनिहाय कारवाई:
1. नेवासा पो.स्टे. – 3 गुन्हे:
अल्ताफ शेख, कानिफनाथ तुवर आणि पाचेगाव येथील 16 वर्षीय विधीसंघर्षित बालकासह 1 जण फरार. मुद्देमाल: 91,200/-
2. सुपा पो.स्टे. – 1 गुन्हा:
शहाजी काळे, योगेश पवार, बबन बांडे यांच्यावर कारवाई. मुद्देमाल: 23,070/-
3. पारनेर पो.स्टे. – 2 गुन्हे:
रोहिदास कोयते, फिरोज इनामदार यांच्यासह 5 जणांवर गुन्हे. 3 आरोपी फरार. अविनाश लंघे, विशाल गाडीलकर, रोहित कोल्हे यांच्यासह 1 जण फरार. मुद्देमाल: 23,310/-
पारनेर आणि सुपा येथील काही आरोपींविरुद्ध बीएनएस कलम 3(5) सह इतर कलमे लावण्यात आली आहेत.
जिल्ह्यात अवैध धंद्यांवर अशाच प्रकारे कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले.


