भाजपचा मोठा निर्णय, ‘त्या’ बड्या नेत्याची तडकाफडकी हकालपट्टी; महाराष्ट्रात खळबळ

नंदुरबार जिल्ह्यातील भाजपमधील अंतर्गत वाद आणखी चिघळला आहे. त्यामुळे पक्षाने यावर अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. भाजपचे माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्या हिना गावित यांच्याविरोधातील एक वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर पक्षाने ही धडक कारवाई केली आहे. या कारवाईमुळे उत्तर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आणि स्थानिक गोटात मोठी खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वी भाजपच्या माजी खासदार हिना गावित यांच्याविरोधात माजी महामंत्री विजय चौधरी यांची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती. या प्रकरणी विजय चौधरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला होता. त्या ऑडिओ क्लिपमध्ये पक्षांतर्गत राजकारण आणि स्थानिक नेत्यांविरोधातील वादग्रस्त वक्तव्ये समोर आल्याचे सांगितले जात आहे.स्थानिक गोटात मोठी खळबळ उडाली आहे.

या व्हायरल ऑडिओ प्रकारामुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याची गंभीर दखल प्रदेश नेतृत्वाने घेतली. अखेर पक्षाने अधिकृत पत्रक जारी करत विजय चौधरी यांची पक्षातून हाकलपट्टी करत असल्याची घोषणा केली. तसेच त्यांना पक्षातील सर्व प्राथमिक सदस्यत्वावरून आणि जबाबदाऱ्यांतून तात्काळ मुक्त करण्यात आले आहे.

या घटनेनंतर भाजप प्रदेश कार्यालयात नंदुरबार कोअर कमिटीची तातडीची बैठक बोलावण्यात आली. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे स्वतः या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेत आहेत. स्थानिक स्तरावरील गटबाजी आणि वाद मिटवण्यासाठी भाजपकडून जोरदार ‘डॅमेज कंट्रोल’ सुरू करण्यात आले आहे.
नंदुरबारमधील स्थानिक वाद वाढल्यास त्याचा आगामी निवडणुकांवर थेट परिणाम होऊ शकतो, हे ओळखूनच पक्षाने चौधरी यांच्यावर कठोर कारवाई करून शिस्तभंगाचा स्पष्ट संदेश दिला आहे. एका बाजूला नाराज नेत्यांना शांत करणे आणि दुसऱ्या बाजूला पक्षातील अंतर्गत गटबाजी रोखणे, हे मोठे आव्हान सध्या भाजप प्रदेश नेतृत्वापुढे उभे ठाकले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles