अभिजीत दीपके यांना सत्ताधारी खासदाराची थेट ऑफर, म्हणाले…

“अभिजीत दीपके हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मानणारे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांनी कॉकरोच जनता पार्टी चालवण्यापेक्षा डॉ. बाबासाहेबांची चळवळ मजबूत करण्यासाठी रिपब्लिकन पक्षात आले पाहिजे. जिथे अन्याय होतो, तिथे आम्ही नक्कीच ठामपणे उभे राहू. अन्याय झाला तरी अन्याय करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठीच आमचे सरकार आहे. आम्ही सत्तेत आहोत म्हणजे सर्व प्रश्न विसरलो असा त्याचा अर्थ होत नाही. त्यामुळे दीपके यांच्यासारख्या नवतरुणांनी रिपब्लिकन पक्षात प्रवेश करावा. त्यांच्यावर पक्षाची मोठी जबाबदारी सोपवून त्यांना रिपब्लिकन पक्षाच्या युथ विंगचे ‘राष्ट्रीय अध्यक्ष’ करण्याची माझी तयारी आहे. वेळ आल्यावर मी त्यांच्याशी याबाबत नक्कीच चर्चा करणार असून त्यांनीही यावर विचार करावा,” अशी खुली ऑफर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अभिजीत दीपके यांना दिली आहे.’नीट’ पेपर लीक प्रकरणाविरोधात सलग महिनाभर तीव्र आंदोलन छेडून देशभरातील तरुणांमध्ये जागृती निर्माण करणारे तरुण नेते अभिजीत दीपके यांच्या धडाडीच्या नेतृत्वाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विशेष कौतुक केले.

रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांचे एकत्रीकरण व्हावे आणि सर्व नेत्यांनी एकत्र येऊन काम करावे, अशी आग्रही भूमिका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मांडली. तसेच, रिपब्लिकन ऐक्यासाठी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची आणि चार पावले मागे जाण्याची आपली तयारी असल्याचे मोठे विधान त्यांनी केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles