राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचे पीए अजित दशावतारे यांच्या पीए यांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. अजित दशावतारे यांच्या मुलीची हत्या झाली की आत्महत्या ही मात्र स्पष्ट झाले नाही. बारामतीतील रुई येथील साई गणेश नगर येथे त्या ठिकाणी फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे. पुढील तपास सुरू आहे. या घटनेनंतर आमदार रोहित पवार बारामतीत दाखल झाले. त्यांनी पोलिसांची भेट घेतली. रात्री आईचं आणि मुलीचं किरकोळ भांडण झालं, त्यानंतर मुलगी घरातून निघून गेली. मुलगी मिसिंग असल्याची तक्रार पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली. मात्र सकाळी घराजवळ तिचा मृतदेह आढळला आहे. बारामतीतील रुई येथील साई गणेश नगर येथे त्या ठिकाणी फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे. तर या घटनेबाबत माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की,”मी आता बारामती मेडिकल कॉलेजला आलेलो. माझा पीए अजित, जो माझ्याबरोबर जिल्हा परिषदेपासून आहे, त्याच्या परिवारामध्ये त्याची १५ वर्षांच्या मुलीचा मृत्यू काल झाला, सकाळी झाला, खरंतर पोलीस आपल्याला नंतर सांगतीलच. कशामुळे झाला, काय घडलं, कसं घडलं…हे तपासानंतर आपल्याला त्याठिकाणी कळेल. पण अजित आणि त्याच्या परिवारावर दुःखाचा खूप मोठा डोंगर कोसळलेला आहे आणि आपल्या पोटची मुलगी, जर काही कारणांमुळे तिचा मृत्यू होत असेल, तेसुद्धा एवढ्या कमी वयामध्ये, कुठल्याही वडिलांसाठी ही गोष्ट, समजून घेण्याच्या पलीकडे असते, अशी भावना रोहित पवारांनी व्यक्त केली
पुढे रोहित पवार म्हणाले की, पवार परिवार, मी, माझा सगळा परिवार व त्याचबरोबर बारामती ॲग्रोचे सर्व जे कर्मचारी आहेत, हे अजित आणि त्याच्या परिवाराबरोबर आहेतच. डीवायएसपी साहेबांबरोबर माझी चर्चा झाली. दवाखान्यामध्ये असणारे जे मेडिकल ऑफिसर आहेत त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांना मी विनंती केली. एक तर पोस्टमार्टम होत असताना त्याच्यामध्ये हलगर्जीपणा कुठेही नको. पोलिसांकडनं सुद्धा माझी अपेक्षा आहे की याच्यामध्ये हलगर्जीपणा न करता खरं काय घडलं. काय कारणं आहेत, कशामुळे तिचा मृत्यू झाला. हे कुठं ना कुठं तरी त्याठिकाणी आपल्याला बघावं लागेल. त्यामुळे तपास न झाल्यामुळे आणि लहान मुलीचा हा मुद्दा असल्यामुळे याच्यात मला आता तरी खूप काही तिथं सांगता येणार नाही. पण पुढच्या काही तासांमध्ये आपल्याला कळेल की खरंच काय घडलं, काय कारणं आहेत. त्यामुळे त्यांच्या परिवाराशी चर्चा करून मग पुढे मीडियाबरोबर काय बोलायचं हे मी त्याठिकाणी ठरवेन, असंही पुढे रोहित पवारांनी म्हटलं आहे.


