विलीनीकरणाच्या चर्चेदरम्यान राष्ट्रवादीच्या आमदाराचा मोठा निर्णय; निवृत्तीची केली घोषणा

गेल्या काही दिवसापासून दोन्ही राष्ट्रवादी म्हणजेच शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येणार असल्याची चर्चांनी जोर धरला होता. मात्र सुप्रिया सुळे या सर्वा चर्चा फेटाळून लावल्या आहेत. दुसरीकडे विलीनीकरणावरून दोन्ही गटातील आमदार नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्याचदरम्यान आता राष्ट्रवादीच्या आमदाराने मोठा निर्णय घेत थेट राजकारणातून निवृत्ती घेतलीय.इतकेच नाही तर आपलला वारसदार कोण असेल याचीही घोषणा त्यांनी केलीय. राष्ट्रवादीच्या आमदाराच्या या घोषणेमुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडालीय. राजकारणातून निवृत्ती घेणारे हे आमदार आहेत, प्रकाश सोळंके. ोळंके यांनी आपल्या राजकीय निवृत्तीची घोषणा करत आपला राजकीय वारसदार जाहीर केलाय. माजलगाव येथे आयोजित विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली.

आगामी विधानसभा निवडणुकीत आपण उमेदवार नसणार असून, आपला पुतण्या जयसिंह सोळंके हा पुढचा उमेदवार असेन. ज्या पद्धतीने आजपर्यंत मला प्रेम आणि साथ दिली, त्याच पद्धतीने यापुढेही सोळंके कुटुंबावर प्रेम कायम ठेवा, असं आवाहनही त्यांनी उपस्थित जनसमुदायाला केलं. विशेष म्हणजे, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रकाश सोळंके यांनी निवडणूक न लढवण्याची आणि राजकीय वारसदार पुढे आणण्याची घोषणा केली होती. मात्र, आता पुन्हा एकदा राजकीय निवृत्तीचा पुनरुच्चार करत त्यांनी जयसिंह सोळंके यांचं नाव पुढे केल्याने माजलगावच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाची चर्चा सुरूय. अजित पवार आणि शरद पवार यांच्या गटातील नेत्यांकडून याबाबत वेगवेगळी विधाने केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील माजलगावमधून आलेल्या या घोषणेने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधलंय.

मी आता उमेदवार म्हणून तुमच्यासमोर येणार नाही. जयसिंहभैय्याला मी आता उमेदवारी देईन. जसे उमेदवार नेता म्हणून तुम्ही मला प्रेम दिले, तसे प्रेम जयसिंहभैय्याला देखील द्या. माझ्या वडिलांना म्हणजे सुंदरराव सोळंके यांना माजलगावकरांनी आमदार म्हणून कमी कालावधी दिला. पण आम्हाला माजलगावकरांनी सेवा करण्याची संधी दिली. जयसिंहभैय्याला देखील सेवेची संधी द्या.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles