Ahilyanagar…..इन्स्टाग्रामवर अश्लील फोटो टाकून प्रेयसीची बदनामी

राहुरी-प्रेमसंबंध असताना प्रेयसीची बदनामी करण्याच्या उद्देशाने तिचे अश्लील फोटो इन्स्टाग्रामवर प्रसारित केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत जाब विचारण्यासाठी प्रेयसी व तिचे नातेवाईक आरोपी प्रियकराच्या घरी गेले असता, त्याने त्यांना शिवीगाळ करत कोयत्याने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित 24 वर्षीय तरुणी ही राहुरी तालुक्यातील एका गावातील रहिवासी असून सध्या शहरात राहते. तिचे राहुरी तालुक्यातील कानडगाव येथील सूरज घोडके याच्याशी प्रेमसंबंध होते. दरम्यान, दि. 5 नोव्हेंबर रोजी तिचे अश्लील फोटो इन्स्टाग्रामवर प्रसारित करण्यात आल्याची माहिती तिला मिळाली. याप्रकरणी तिने कुर्ला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

त्यानंतर 10 नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तरुणी व तिचे नातेवाईक कानडगाव येथे आरोपी सूरज घोडके याच्या घरी गेले. यावेळी तरुणीने, माझे अश्लील फोटो इन्स्टाग्रामवर टाकून बदनामी का करतोस, असा जाब आरोपीला विचारला. तसेच तिचे नातेवाईकही आरोपीला समजावून सांगत होते. मात्र, याचा राग आल्याने आरोपीने तरुणी व तिच्या नातेवाईकांना शिवीगाळ करून कोयत्याने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शिवाय कोयत्याने तोडून टाकण्याची धमकीही दिली.

याप्रकरणी तरुणीने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सूरज अशोक घोडके (रा. कानडगाव, ता. राहुरी) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 115(2), 118(1), 351(2) व 352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles