Saturday, December 13, 2025

पारनेर तालुक्यात दहावीच्या विद्यार्थिनीवर लॉजमध्ये अत्याचार; गुन्हा दाखल

पारनेर: पारनेर शहरात एका विद्यालयात शिकणाऱ्या दहावीच्या विद्यार्थिनीवर लॉजमध्ये नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी पॉस्को अंतर्गत पारनेर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पारनेर येथे एका विद्यालयात इयत्ता दहावीला शिक्षण घेत असलेल्या पंधरा वर्षीय विद्यार्थिनीवर तुषार तात्या भाऊ चत्तर (रा.सिद्धेश्वर वाडी ता. पारनेर) याने मुलीच्या वडिलांसोबत असणाऱ्या ओळखीचा गैरफायदा घेत मुलगी शाळेत रस्त्याने जात असताना तिला आपल्या दुचाकीवरून शाळेत सोडले, असे काही वेळा झाले व मुलीशी ओळख वाढवली.

मुलीच्या आजोबांनी तिला शाळेच्या गेटवर सोडले असता तुषार चत्तर याने तिला आवाज देत वडिलांच्या दवाखान्याचे कार्ड घेऊन जा, असे सांगितले व ते कार्ड एका फोटो स्टुडिओमध्ये आपली बहीण आहे, तिच्याकडे असल्याचे सांगितले. मुलगी कार्ड घेण्यासाठी तेथे गेले, असता स्टुडिओ बंद असल्याचे दिसून आले तुषार चत्तर हा त्या मुलीच्या पाठीमागेच होता. त्याने तिला पारनेर शहरात असणाऱ्या एका लॉजवर नेले. मुलगी रूममध्ये जात नसल्याचे पाहून त्याने तिला डोक्यात चापट मारली. मुलीने मोठ्याने आवाज करण्याचा प्रयत्न केला असता तिचे तोंड दाबून तिच्यासोबत अत्याचार केला व हा प्रकार कोणाला सांगितल्यास मारून टाकण्याची धमकी दिली.

त्यानंतर मुलगी घरी गेली. तिने लॉजवर घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर आई-वडीलांनी संबंधित शाळेत येऊन शिक्षकांना हकीगत सांगितली. तुषार चत्तर याने तीन वेळा अत्याचार केल्याचे मुलीने सांगितले. पारनेर पोलिस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles