Thursday, October 30, 2025

अहिल्यानगर मध्ये दिड लाखांची लाच….. सहाय्यक पोलीस फौजदारासह बडा नेता एसीबीच्या जाळ्यात

अहिल्यानगर – पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गांजाच्या केसमध्ये आरोपी न करता साक्षीदार करण्याच्या मोबदल्यात ५ लाख रुपयांची मागणी करून १ लाख ५० हजारांची लाच स्वीकारताना कोतवाली पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार राजेंद्र प्रभाकर गर्गे यांच्यासह एका इसमास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावून रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई २१ ऑगस्ट रोजी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नगरमध्ये केली आहे.
याबाबतची माहिती अशी की तक्रारदारास कोतवाली पोलीस स्टेशन येथे नोंद असलेल्या गांजाच्या केस मध्ये आरोपी न करता साक्षीदार करण्याच्या मोबदल्यात कोतवाली पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार राजेंद्र प्रभाकर गर्गे (वर्ग ३)(वय 57 वर्ष, कोतवाली पोलीस स्टेशन, राहणार समर्थ नगर, सावेडी, जिल्हा अहिल्यानगर) यांच्याकरिता मध्यस्थ खाजगी इसम अशोक रामचंद्र गायकवाड (वय 71, वर्षे व्यवसाय शेती , राहणार बिशोब लॉइड कॉलनी सावेडी, जिल्हा अहिल्या नगर) यांनी २० ऑगस्ट २०२५ रोजी तक्रारदार यांच्याकडे ५ लाखांच्या मागणीवर तडजोडी अंती १,५०,००० लाख रुपये लाचेची मागणी केलेली आहे. सदर मागणीस सहाय्यक फौजदार राजेंद्र गर्गे यांनी प्रोत्साहन दिल्याचे लाच मागणी कारवाई दरम्यान स्पष्ट झालेले आहे. २१ ऑगस्ट २०२५ रोजी करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान तक्रारदार हे लाचेची रक्कम खाजगी इसम अशोक रामचंद्र गायकवाड यांना देणे करिता गेले असता, खाजगी इसम गायकवाड यांनी स्वतः तक्रारदार यांच्याकडून १,५०,००० रुपये लाचेची रक्कम स्वीकारलेली आहे. पथकाने सापळा लावून आरोपींना ताब्यात घेतले असून तोफखाना पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

ही कारवाई ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी तथा पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक श्रीमती नेहा तुषार सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार विनोद चौधरी,चालक पोलीस हवालदार विनोद पवार, पोलीस कॉन्स्टेबल अनिल गांगोडे यांच्या पथकाने केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगरचे पोलिस उप अधीक्षक अजित त्रिपुटे हे पुढील तपास करत आहेत.
दरम्यान लाचेच्या सापळ्यात अडकलेले कोतवाली पोलिस स्टेशनचे सहाय्यक फौजदार राजेंद्र गर्गे यांच्या सेवा निवृत्तीला आणखी काही महिनेच बाकी आहेत. गर्गे यांच्यावर खात्याचे काही वरिष्ठ अधिकारी कायम मेहेरबान राहिलेले आहेत. त्यांची बहूतांश सेवा ही नगर शहरातच झाली आहे. त्यांची बदली झाली तरी ती केवळ तोफखाना, कोतवाली आणि भिंगार कॅम्प पोलिस स्टेशन या तीन ठिकाणीच फिरत राहिली. त्यामुळे त्यांचा वेगळाच काहीसा रुबाब तयार झाला होता अशी चर्चा शहरात सुरू आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles