पाथर्डी -एका चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. पाथर्डी-कोरडगाव या राष्ट्रीय महामार्गावर सत्यभामा पेट्रोल पंपासमोर सोमवारी (दि. 25 ) मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. या अपघातातस दुचाकीस्वार शंकर रणजीत बोरुडे (वय 43, रा. बोरुडे वस्ती, दुलेचांदगाव रोड, पाथर्डी) यांचा मृत्यू झाला.शंकर बोरुडे हे कोरडगाव रोडवरील विजय लॉन्स शेजारील आपले हॉटेल बंद करून दुचाकीवरून घरी जात असताना पाथर्डीकडून येणार्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, कार दुचाकीला धडकून रस्त्याच्या बाजूला पलटी झाली. या अपघातात कारमधील प्रकाश संभाजी कारखेले (वय 40) आणि सुरेखा प्रकाश कारखेले (वय 35, रा. त्रिभुवनवाडी, ता. पाथर्डी) हे पती-पत्नी जखमी झाले. मयत शंकर बोरुडे हे माजी उपनगराध्यक्ष बंडू बोरुडे यांचे धाकटे बंधू होत. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.
- Advertisement -


