Sunday, March 8, 2026

अहिल्यानगर शहरात हॉटेल रेटिंगच्या नावाखाली व्यावसायिकाला 26 लाखाला ऑनलाइन गंडा

अहिल्यानगर-सावेडी उपनगरातील व्यावसायिकाला ऑनलाइन हॉटेल रेटिंग देण्याचे आमिष दाखवून 25 लाख 94 हजार 390 रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी व्यावसायिकाने 6 मार्च 2026 रोजी फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 6 ते 11 नोव्हेंबर 2025 या कालावधीत ही घटना घडली. संशयित आरोपी दीपक नायर उर्फ नविनराज आणि मेघा उर्फ मालू या दोघांनी व्हॉट्सपच्या माध्यमातून फिर्यादीशी संपर्क साधला. हॉटेलला ऑनलाइन रेटिंग दिल्यास तुम्हाला 20 ते 30 टक्के नफा मिळवून देतो, असे आमिष दाखवून त्यांनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला. या आमिषाला बळी पडून फिर्यादीने संशयित आरोपींना रक्कम दिली. मात्र, परतावा न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.त्यानंतर फिर्यादीने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरून पोलिसांनी दीपक नायर आणि मेघा (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून, सायबर गुन्हेगारांचा शोध घेतला जात आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles