Saturday, February 21, 2026

व्यावसायिकाला मारहाण एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांविरूध्द गुन्हा दाखल

अहिल्यानगर- मनमाड रस्त्यावरील विळद (ता. अहिल्यानगर) शिवारातील नर्सरी जवळ वाहनाचा कट लागल्याच्या कारणावरून व्यावसायिकाला लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांविरूध्द गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

व्यावसायिक बाळासाहेब सुरेशराव जगताप (वय 59) यांनी फिर्याद दिली आहे. सोमवारी (26 जानेवारी) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सचिन बाबासाहेब गिते (रा. धारवाडी, ता. पाथर्डी), महादेव किसन बडे (रा. जागेवाडी, ता. पाथर्डी), संजय परसराम पवार (रा. पारगाव, ता. शिरूर कासार, जि. बीड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. वाहनाचा कट लागल्याच्या कारणावरून सचिन गिते व महादेव बडे यांनी जगताप यांना अडवले. त्यानंतर त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत मारहाण केली.याच दरम्यान त्या ठिकाणी खासगी बसचा चालक संजय पवार हा देखील आला. या तिन्ही संशयित आरोपींनी संगनमत करून फिर्यादी जगताप यांना जमिनीवर पाडले आणि लाकडी दांडक्याने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. इतकेच नव्हे तर, तुला गाडीखाली घालून ठार मारू अशी धमकीही आरोपींनी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेत बाळासाहेब जगताप जखमी झाले असून, त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार थोरात करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles