Saturday, February 21, 2026

महिलेशी गैरवर्तन करणार्‍या तरूणावर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अहिल्यानगर-भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत जनावरे चारण्यासाठी गेलेल्या एका महिलेचा दुचाकीवरून आलेल्या एका व्यक्तीने विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी (7 नोव्हेंबर) दुपारी दोनच्या सुमारास घडली आहे. यासंदर्भात पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात विनयभंग, अ‍ॅट्रॉसिटी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संभा परभणे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. कापूरवाडी, ता. अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गुरूवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ब्रम्हतळे, आलमगीर येथे घडली. पीडित महिला या परिसरात आपली जनावरे चारत होत्या. यावेळी संशयित आरोपी संभा परभणे हा तेथे आला. फिर्यादी महिलेच्या जातीची माहिती असतानाही, त्याने लैंगिक उद्देशाने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीनुसार, आरोपीने पीडितेला मिठी मारून फौजदारी पात्र बळप्रयोग केला आणि लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तिचा विनयभंग केला.

घडलेल्या प्रकारानंतर पीडित महिलेने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी संभा परभणे विरोधात विनयभंग, अ‍ॅट्रॉसिटी आदी कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांनी घटनास्थळी भेट दिली असून अधिक तपास ते करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles