Saturday, November 1, 2025

मोबाईलवर पोर्न दाखवून महिलेशी अश्लिल वर्तन ,पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दाखल

मोबाईलमध्ये अश्लिल (पोर्न) व्हिडिओ दाखवून एका महिलेशी गैरवर्तन केल्याची घटना भिंगार उपनगरात घडली. याप्रकरणी 29 वर्षीय पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साद फकीर महंमद शेख (रा. ब्रम्हतळे, आलमगीर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित व्यक्तीचे नाव आहे.
सदर घटना बुधवारी (7 मे) दुपारी 12.30 वाजता घडली.फिर्यादीच्या घरातील लाईट वायरिंग आणि लाईट बोर्ड दुरूस्ती करण्यासाठी आलेल्या साद फकीर महंमद शेख याने तिच्यासमोर त्याच्या स्मार्टफोनवरून अश्लिल (पोर्न) व्हिडिओ दाखवला. यानंतर त्याने तिचा उजवा हात पकडून तोंड दाबले आणि तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. शेखच्या या वर्तनामुळे फिर्यादीस लज्जा उत्पन्न झाली. दरम्यान, सदरचा प्रकार घडल्यानंतर पीडिताने लगेच भिंगार कॅम्प पोलीस ठाणे गाठून पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला.

पीडिताने दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच कॅम्प पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. अंमलदार बी. एस. म्हस्के अधिक तपास करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles