अहिल्यानगर – न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे नमुद मिळकतीचा वाटप तक्ता मंजुर करून ताबा देण्याचा आदेश तहसिलदार यांच्याकडुन मिळवुन देण्यासाठी तक्रारदाराकडे 7,000 रूपये लाचेची मागणी करून ती स्विकारताना कोपरगाव तहसील कार्यालयातील महसूल सहायक वर्ग 3 श्रीमती अंजना पंडीत पवार ( वय 36 वर्षे ) यांना नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई 2 जानेवारी रोजी कोपरगाव तहसील कार्यालयात करण्यात आली.मिळकतीचा वाटप तक्ता मंजुर करून ताबा देण्याचा आदेश तहसिलदार यांच्याकडुन मिळवुन देण्यासाठी महसूल सहायक श्रीमती अंजना पवार यांनी तक्रारदाराकडे 7000 रूपये लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधला. त्यानंतर सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीमती छाया देवरे यांच्या नेतृत्वाखाली पोकॉ. गजानन एकनाथ गायकवाड, पोकॉ सचिन नानाभाउ सुदुक, पोकॉ. वैभव बबन सुपेकर, चालक पोहेकॉ हारुन शेख यांच्या पथकाने सापळा लावून 7 हजाराच्या लाचेची मागणी करून 7 हजारांची लाच स्वीकारताना श्रीमती पवार यांना रंगेहाथ पकडण्यात आले. लोकसेवक श्रीमती अंजना पवार यांनी तहसिल कार्यालय, कोपरगाव येथे 7,000 रुपये लाचेची रक्कम स्विकारून स्वतःच्या पदाचा व अधिकाराचा दुरुपयोग करुन स्वतःचा सांपत्तीक फायदा करुन घेण्याच्या हेतुन गुन्हेगारी गैरवर्तन केले. त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलम 7 प्रमाणे कोपरगाव शहर पोलीस स्टेशन गु.र.नं /2026 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूढील तपास पोलीस उप अधिक्षक अजित त्रिपूटे करत आहेत.
7 हजारांची लाच स्वीकारताना महिला महसूल कर्मचाऱ्यास रंगेहाथ पकडले : नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
- Advertisement -


