Wednesday, October 29, 2025

मा. आ. अरुणकाका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न

मा. आ. अरुणकाका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न

युवकांनी पुढे येऊन रक्तदानाची लोक चळवळ उभी करावी – आयुक्त यशवंत डांगे

अहिल्यानगर : रक्तदान शिबिर ही काळाची गरज बनली असून युवकांनी पुढे येऊन रक्तदानाची लोक चळवळ उभी करावी. मा.आमदार अरुणकाका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या 21 वर्षापासून रक्तदान शिबिराचा सुरू असलेला सामाजिक उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी केले.
माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी आमदार संग्राम जगताप, माजी उपमहापौर गणेश भोसले, राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, माजी स्थायी समिती सभापती कुमारसिंह वाकळे,अविनाश घुले, मनोज कोतकर, प्रा.माणिकराव विधाते, सुंतीलाल कोठारी, माजी नगरसेवक संजय चोपडा, निखिल वारे, प्रकाश भागानगरे, उद्योजक राजेश भंडारी, ज्ञानेश्वर राजकर, दीपक सूळ, विजय गव्हाळे, अरविंद शिंदे, विपुल शेटीया, कमलेश भंडारी, मनोज साठे, किरण भंडारी, संतोष बोरा, रेश्माताई आठरे, आशाताई निंबाळकर, संतोष लांडे, संभाजी पवार, बाबुशेठ लोढा, सुनील रामदासी, दत्तापाटील सप्रे, माधव लामखडे, वैभव वाघ, मंगेश खताळ आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
समाजामध्ये नव-नवीन आजार उद्भवताना दिसत आहे. तसेच अपघाताचे देखील प्रमाण वाढले असल्यामुळे रुग्णांना मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासत असते, रक्त वेळेवर न मिळाल्यास एखाद्या रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू देखील होत असतो यामुळे रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी सामाजिक संस्था, युवक वर्ग यांनी पुढे येऊन मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे गरजेचे आहे. रक्तदान हे श्रेष्ठ दान असून आपण समाजामध्ये वावरत असताना समाजाचे काहीतरी देणे लागते या भावनेतून आपले कर्तव्य पार पाडावे. कोरोना संकट काळामध्ये जनतेला आव्हान केल्यानंतर नगरकरांनी पुढे येऊन मोठ्या प्रमाणात रक्तदान केले असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.
माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते यावेळी आमदार संग्राम जगताप व जिल्हा परिषद माजी सदस्य सचिन भाऊ जगताप हे अपल्या वडलांच्या वाढदिवसा निम्मित्त २१ वर्षापासून रक्तदान करत असतात. यावेळी काकांवर प्रेम करणारे कार्यकर्ते व महिलांनी देखील मोठ्या संख्येने रक्तदान शिबिरामध्ये भाग घेतला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles