अहिल्यानगर – शहरातील विराज कॉलनी, सावेडी येथे घरफोडी करत 14,75,000 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेणारा अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ठाणे येथून जेरबंद केला आहे.रफिक मेहबुब शेख वय 43 वर्षे, रा. पहिली राबोडी, जुम्मा मस्जिदचे पाठीमागे, बापुजीनगर, राबोडी, ठाणे वेस्ट असे या आरोपीचे नाव आहे.
याबाबत हकिगत अशी की, फिर्यादी अशोककुमार विजयकुमार अग्रवाल वय 50 रा. बंगला क्र. 06, विराज कॉलनी, सावेडी, ता. जि. अहिल्यानगर हे नातेवाईकांकडे बाहेर गावी गेलेले असतांना दिनांक 13 ते 16 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीच्या घराचे पाठीमागील दरवाजाचे लॉक तोडुन आत प्रवेश करुन लॉकर व कपाटातील सोने, चांदीचे दागिने, घड्याळ, रोख रक्कम असा एकुण 14,75,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेलेला आहे. सदर घटनेबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलीस ठाणे गु.र.नं. 1191/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 331(3), 331 (4), 305 (a) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर चोरीची घटना घडल्यानंतर वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, डॉ. दिलीप टिपरसे, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग, किरणकुमार कबाडी, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी घटनाठिकाणी भेट देवुन पाहणी केली. सदर गुन्हा उघडकीस आणणेकामी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर येथील पोउपनि राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार सुरेश माळी, शाहिद शेख, गणेश धोत्रे, फुरकान शेख, प्रकाश मांडगे, रोहित येमुल, अमृत आढाव, महिला पोलीस अंमलदार सोनाली भागवत यांचे पथक तयार करुन सदर पथकास गुन्हा उघडकीस आणणेकामी सुचना देण्यात आल्या.
पथकाने अशा प्रकारे गुन्हे करणारे आरोपींची माहिती संकलित करुन त्या आधारे तपास करत असतांना पथकास व्यवसायीक कौशल्याच्या आधारे सदरचा गुन्हा हा रफिक महेबुब शेख रा. ठाणे याने व त्याच्या इतर साथीदारांनी केला असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार ठाणे या ठिकाणी जावुन आरोपीचा शोध घेत असतांना सदरचा आरोपी हा राबोडी, जि. ठाणे या ठिकाणी असल्याची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जावुन 1) रफिक मेहबुब शेख वय 43 वर्षे, रा. पहिली राबोडी, जुम्मा मस्जिदचे पाठीमागे, बापुजीनगर, राबोडी, ठाणे वेस्ट यास ताब्यात घेण्यात आले . सदरचा गुन्हा हा त्याच्या इतर दोन फरार साथीदारांसह केला असल्याची कबुली त्याने दिली आहे.
आरोपी रफिक मेहबुब शेख हा रेकॉर्डवरील आरोपी असुन त्याच्याविरुध्द यापुर्वी सातारा, ठाणे, सांगली जिल्ह्यामध्ये खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
1 कराड, जि. सातारा 517/2024 भादवि कलम 380, 457, 454
2 राबोडी, जि. ठाणे 157/2000 भादवि कलम 454, 457, 380
3 राबोडी, जि. ठाणे 31/2023 भादवि कलम 307 वगैरे
4 विश्रामबाग, जि. ठाणे 636/2023 भादवि कलम 457, 380, 34
ताब्यातील आरोपीस तोफखाना पोलीस ठाणे गु.र.नं. 1191/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 331(3), 331 (4), 305 (a) प्रमाणे दाखल गुन्ह्याचे तपासकामी हजर करण्यात आले असुन, पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन हे करीत आहेत.


