कोठला परिसरातील नागरिकांकडून जिल्हाधिकारी यांना निवेदन.
परिसरातील राजरोसपणे चालू असलेले गांजा, दारू, मटका क्लब व इतर अवैध धंदे बंद करण्याची मागणी.
नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर शहरातील कोठला परिसरात दारू, गांजा, मटका क्लब व इतर अनेक अवैध धंदे राजरोसपणे चालू आहे. या अवैध धंद्यामुळे परिसरातील धार्मिक स्थळाला त्रास होत असून हे अवैध धंदे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे व हे अवैद्य धंदे लवकरात लवकर बंद करण्याच्या मागणीसाठी परिसरातील नागरिकांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते इसरार शेख समवेत अयुब शेख, अयुब सैय्यद आदीसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
पुढे निवेदनात म्हटले आहे की, अहिल्यानगर शहरांमध्ये कोठला बस स्टॅन्ड समोरील शेजारील आजूबाजूच्या परिसरामध्ये गांजा, दारू, मटका क्लब व इतर अवैध धंदे चालू असून सदरचा परिसर हा रहदारीचा असून त्यामध्ये वरील अवैद्य धंदे चालू असून या परिसरामध्ये धार्मिक स्थळे असून धार्मिक विधीच्या वेळी अडथळा निर्माण होत असल्याने सदरील हद तोफखाना पोलीस स्टेशन अंतर्गत असून या अवैध धंद्यांवर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. त्यामुळे या अवैध धंद्यांवर लवकरात लवकर कारवाई करून बंद करण्यात यावे अन्यथा येत्या १५ दिवसात कारवाई झाली नाही तर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
नगर शहरातील कोठला परिसरातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी ,जिल्हाधिकारी यांना निवेदन
- Advertisement -


