Sunday, March 8, 2026

नगर शहरात शिवसेना शहरप्रमुख किरण काळे विरोधात गुन्हा दाखल ,काळे पोलिसांच्या ताब्यात

अहिल्यानगर- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अहिल्यानगर शहरप्रमुख किरण काळे विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात एकवीस वर्षीय विवाहित महिलेने किरण काळे विरोधात गुन्हा दाखल केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि तिचा पती यांच्यात सतत वाद होते. या वादातून मदत मिळण्याकरिता पीडिता महिला आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख किरण काळे एकमेकांच्या संपर्कात आले होते. पीडित महिलेला मदत करण्याचे आमिष दाखवून शहर प्रमुख किरण काळे याने महिलेवर बलात्कार केला.

2023 ते 2024 पर्यंत किरण काळे याने स्वतःच्या संपर्क कार्यालयात बलात्कार केला. तसेच ही गोष्ट कोणाला कळली तर जीवे मारण्याची धमकी किरण काळेकडून देण्यात येत होती, असे फिर्यादीत म्हटले आहे. पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात किरण काळेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण काळेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाला मोठी गळती लागल्याचे दिसून येत आहे. एकामागे एक नेते हे ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करून महायुतीतील घटक पक्षात सामील होत आहेत. एकीकडे ठाकरे गटातील नेत्यांची गळती थांबवण्याचे मोठे आव्हान पक्षासमोर असतानाच अहिल्यानगरच्या शहर प्रमुखावर गुन्हा दाखल झाल्याने हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles