Wednesday, October 29, 2025

माध्यमिक शिक्षक सोसायटीत परिवर्तनचा दणदणीत विजय, सर्वच्या सर्व जागा जिंकत विरोधकांकडुन सत्ताधाऱ्यांना धक्का

‘माध्यमिक शिक्षक सोसायटीत परिवर्तनचा दणदणीत विजय

सर्वच्या सर्व जागा जिंकत विरोधकांकडुन सत्ताधाऱ्यांना धक्का

जिल्हयातील माध्यमिक शिक्षकांची कामधेनू असणाऱ्या माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या संचालक मंडळ निवडणुकीत यंदा सत्तातंर झाले.विरोधी परिवर्तन मंडळाने २१ च्या २१ जागा जिंकत सत्ताधारी पुरोगामी मंडळाचा सुपडा साफ केला. विरोधकांनी या निवडणुकीत दाखवलेली एकजुट कामाला आल्याचे दिसुन आले.
जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या २१ संचालकमंडळाच्या निवडीसाठी रविवारी मतदान झाले. आज जिल्हा उपनिबधक ( सहकार ) यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात मतमोजणीची प्रकिया पार पडली. शिक्षक सोसायटीत जेष्ठ नेते प्रा. भाऊसाहेब कचरे यांच्या नेतृत्वाखालील पुरोगामी सहकार मंडळाची २५ वर्षांपासुन एकहाती सत्ता होती. यंदाच्या निवडणुकीत विविध शिक्षक संघटनांनी एकीची वज्रमुठ दाखवत सत्ताधाऱ्यांना शह देण्यासाठी स्वाभिमानी परिवर्तन मंडळ रिंगणात उतरवले. यात सत्ताधाऱ्यांचा दारूण पराभव करीत परिवर्तन मंडळाने सर्वच्या सर्व जागा जिंकत सत्ताधाऱ्यांना धक्का दिला .
सोसायटीत सत्ताधारी मंडळाने पारदर्शी कारभाराचा दावा करीत मतदारांना पुन्हा सत्ता देण्याचे आवाहन केले होते मात्र मतदारांनी यंदा परिवर्तन घडवुन विरोधकांना संधी देण्याचा निर्णय घेतल्याचे मतमोजणीतुन स्पष्ट झाले . शिक्षक नेते राजेंद्र लांडे , प्राचार्य सुनील पंडित आणि परिवर्तन मंडळाचे अध्यक्ष दत्ता नारळे यांनी सर्व शिक्षक संघटनांना एकत्र करीत सत्ताधाऱ्यांसमोर कडवे आव्हान उभे केले. सर्व संघटनाची एक वज्रमुठ तयार करण्यात विरोधक यशस्वी झाले. विरोधकांच्या एकीमुळे तिसरी आघाडीचा प्रयत्न अयशस्वी झाला .सत्ताधाऱ्यांसमोर विरोधकांनी कडवे आव्हान उभे केल्याने परिवर्तन मंडळाचा विजयाचा मार्ग सुकर बनला .
त्यात सत्ताधारी मंडळाकडुन इच्छुकांची संख्या मोठी होती . त्यात सत्ताधाऱ्यांनी विद्यमान संचालकांना पुन्हा संधी न देता नविन उमेदवार रिंगणात उतरवले. यामुळे जुन्या निष्ठावान संचालकांमध्ये नाराजी वाढली आणि त्यांनी सत्ताधाऱ्यांची साथ सोडत विरोधी परिवर्तन मंडळाच्या प्रचाराची धुरा आपल्या हातात घेतली.

: सभासदांनी निवडणूक हातात घेतली होती.आमच्याच फुट पाडण्याचा प्रयत्न ही झाला . सत्ताधाऱ्यांच्या एकाधिकारशाहीला सभासद कंटाळले होते. आम्ही शिक्षकांसाठी संघर्ष करणारे उमेदवार रिंगणात उतरवले. सर्व विरोधक व शिक्षक संघटना एकत्र आले आणि तिसऱ्या आघाडीचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न हाणून पाडला . त्यांचे ७ संचालक आमच्या सोबत आले. यामुळे सभासदांनी आमच्यावर विश्वास दाखवला .विरोधकांची एकजुट यशस्वी ठरली . “— राजेंद्र लांडे ( नेते , स्वाभिमानी परिवर्तन मंडळ )

विजयी उमेदवार व मते
▪️सर्वसाधारण
बाजीराव अनभुले -४३००
राजेंद्र कोतकर -४६३६
अतुल कोताडे -४२७५
सुधीर कानवडे -४६२९
संभाजी गाडे -४६२६
बाळाजी गायकवाड -४४९०
उमेश गुंजाळ -४६३८
आप्पासाहेब जगताप -४५०५
सुनील दानवे-४७२७
किशोर धुमाळ -४५६२
विजय पठारे -४२४८
छबु फुंदे -४३८९
साहेबराव रक्टे -४३५२
शिवाजी लवांडे -४३११
आप्पासाहेब शिंदे -५२३०
महेंद्र हिंगे -४६३७
▪️ महिला राखीव
वर्षा खिलारी -४८९२
वैशाली दारकुंडे -४८२३
▪️ अनुसुचित जाती
सुरज घाटविसावे -४६२४
▪️ इतर मागासवर्ग
अर्जुन वाळके -४६३८
▪️भटक्या – विमुक्त
बाबासाहेब बोडखे – ५१२०
मतमोजणीची प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी गणेश पुरी यांचे नेतृत्वाखाली 250 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आले आहेत. यासह राखीव कर्मचारी यावेळी उपस्थित ठेवण्यात आले आहे. मतमोजणीची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles