डॉ . बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहात लहान मुलाला बेल्टनं अमानुष मारहाण
जामखेड (प्रतिनिधी – नासीर पठाण )
जामखेड -शहरातील आरोळे वस्ती
 येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासी वसतीगृहात इयत्ता आठवीच्या मुलांना नववीच्या मुलांना मारहाण झाली आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दि. २१ रोजची घटना आहे. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अहिल्यानगर प्रविण कोरगंट्टीवार आले असून पोलीस निरीक्षक महेश पाटील व मारहाण झालेल्या व मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आईवडिल यांची संयुक्त मिटिंग चालू आहे. कोरगंट्टीवार यांनी त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली असून ते चौकशी करून संध्याकाळ पर्यंत अहवाल देणार आहेत. सर्व मुले अल्पवयीन असल्याने सदर प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न कालच झाला होता. परंतु व्हिडीओ व्हायरल झाला त्यामुळे प्रशासन हालले आहे. मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्यांना काढून टाका व कारवाई करावी याबाबत सहायक आयुक्त कोरगंट्टीवार यांबाबत बोलले आहे. संध्याकाळ पर्यंत अहवाल येईल त्यानंतर कारवाई बाबत माहिती मिळेल


