लक्ष्मण हाके यांच्या विधानामुळे ओबीसी विरुद्ध मराठा वाद उफाळला. ऐकलतं. तुम्हाला दांडक्यानं मारू, तुम्ही निजामाची औलाद आहात, अशा वादग्रस्त विधानानंतर लक्ष्मण हाकेंनी मराठा समाजातील मुलींबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मराठा समाज आक्रमक झालाय.हाकेंना प्रत्युत्तर देण्यासाठी थेट 11 जणांची टीम तयार करण्याचा ठरावच मराठा समाजानं घेतलेल्या गोलमेज परिषदेत मजूर केलाय. यात त्यांनी वेळ आल्यास हाकेंना रस्त्यावर ठोकू, अशी जाहीर भूमिका घेतलीय.
दरम्यान मराठा विरुद्ध ओबीसी समाजात आरक्षणाच्या मुद्द्यावरून न्यायालयीन लढाई सुरु असताना दोन्ही समाजातील नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या विधानांमुळे हा वाद आता हाणामारीवर येणार की काय? अशी चर्चा रंगलीय. त्यातच हाकेंनी ही मराठा समाजाला जोरदार प्रत्युत्तर दिलयं.
मुळात मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्यानंतर आरक्षणात वाटेकरी नको, अशीच ओबीसी समाजाची आणि नेत्यांची भूमिका राहिलीय..मात्र ही भूमिका मांडतांना हाकेंची जरांगे आणि मराठा नेत्यांबाबत बोलताना अनेकदा जीभ घसरलीय. त्यामुळे वेळोवेळी वाद निर्माण झाले आहेत. मात्र आता मराठा नेत्यांनी थेट गोलमेज परिषदेतच हाकेंना ठोकण्याची भाषे केल्यानं ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे.


