Tuesday, March 10, 2026

भिंगारमध्ये दोन गटांत तुंबळ हाणामारी ; पाच जण जखमी

अहिल्यानगर-भिंगार परिसरातील यशवंत नगर येथे दोन गटांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीत पाच जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरूध्द फिर्यादी दिल्याने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शनिवारी (7 मार्च) रात्री यशवंत नगर परिसरात काही तरूणांमध्ये वाद सुरू होता. हा वाद मिटवण्याच्या प्रयत्नात दोन्ही गटांमध्ये अचानक हाणामारी झाल्याची माहिती आहे.

विकास मधुकर शिंदे (वय 45, रा. यशवंत नगर, भिंगार) यांनी दिलेल्या जबाबावरून करण खरे, अर्जुन खरे, शक्ती वैद्य, आकाश लोट (सर्व रा. यशवंत नगर, भिंगार) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी विकास शिंदे हे आपल्या मुलाला होत असलेली मारहाण थांबवण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी गेले असता संशयित आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला. आकाश लोट याने लोखंडी सळईने विकास यांच्या डोक्यात प्रहार करून त्यांना जखमी केल्याचे व त्यांची पत्नी, मुलगा, मुलीला मारहाण करून जखमी केले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.दरम्यान, दुसर्‍या बाजूने करण मुकेश खरे (वय 26, रा. डेअरी फार्म, यशवंत नगर, भिंगार) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विकास मधुकर शिंदे, प्रेम विकास शिंदे (दोघे रा. हनुमान मंदिरामागे, डेअरी फार्म, यशवंत नगर, भिंगार) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करण खरे यांच्या घरासमोर आरडाओरडा ऐकू येत असल्याने तेथे त्यांचे वडिल वाद सोडविण्यासाठी गेले. तेथे संशयित आरोपींनी फिर्यादीच्या वडिलांना शिवीगाळ करत मारहाण केली. फिर्यादी त्यांच्या वडिलांना सोडविण्यासाठी गेले असता त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केल्याचे व शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दोन्ही बाजूंकडून दिलेल्या फिर्यादींवरून कॅम्प पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles