Thursday, February 19, 2026

‘रम्बा हो..’ सोशल मीडियावर व्हायरल झाली आजी…Video

सध्या सोशल मीडियावर जिकडे तिकडे ‘रम्बा हो…’ गाण्याने धुमाकूळ घातला आहे. ८० च्या दशकातलं हे जुनं गाणं ‘धुरंधर’ सिनेमात रिक्रिएट करण्यात आलं. हे गाणं १९८१ साली आलेल्या ‘अरमान’ सिनेमातलं आहे. उषा उत्थुप यांनी गायलेलं हे गाणं प्रसिद्ध डान्सर कल्पना अय्यर यांच्यावर चित्रीत करण्यात आलं होतं. नुकतंच कल्पना अय्यर यांनी वयाच्या ७० व्या वर्षी पुन्हा ‘रम्बा हो…’वर डान्स केला.

ओजी ‘रम्बा हो… ‘गर्ल अभिनेत्री कल्पना अय्यर या प्रसिद्धीझोतात आल्या आहेत. आज त्यांचं वय ७० वर्ष आहे मात्र त्यांचा डान्सचा उत्साह अजून तोच आहे. रम्बा हो… या त्यांच्याच गाण्याची पु्न्हा एकदा चर्चा असताना त्यांनीही साडी नेसून गाण्यावर ठेका धरला. सोशल मीडियावर त्यांचं खूप कौतुक होत आहे.

कल्पना अय्यर यांनी ८०-९० च्या दशकात अनेक सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या. तसंच त्यांची गाणीही गाजली. ‘राजा हिंदुस्तानी’ मधील लोकप्रिय ‘परदेसी’ गाण्यात त्या होत्या. तर ‘हम साथ साथ है’ मध्ये त्यांनी रीमा लागूंच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती.

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत कल्पना अय्यर म्हणाल्या, ” मी माझ्या मित्राच्या मुलाच्या लग्नात गेले होते. तिथे मी या गाण्यावर काहीही प्लॅनिंग नसताना डान्स केला. मी काहीच रिहर्सलही केली नव्हती. अगदी इम्प्रॉम्पटू परफॉर्म केलं आणि सोशल मीडियावर अपलोड केला. काही तासातच माझा व्हिडीओ व्हायरल झाला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles