Thursday, October 30, 2025

अहिल्यानगर शहरातील राहणार्‍या महिलेने तिच्या पतीच्या मदतीने सोनार ‘हनीट्रॅप’च्या जाळ्यात,27 लाख उकळले

अहिल्यानगर-केडगाव उपनगरात राहणार्‍या महिलेने तिच्या पतीच्या मदतीने पुण्यातील उरळी कांचन येथील रहिवासी सोनार व्यावसायिकाला ‘हनीट्रॅप’ च्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून वेळोवेळी 27 लाख 56 हजार 162 रूपये घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित सोनाराने रविवारी (6 एप्रिल) दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शितल कैलास काळे व तिचा पती कैलास अंबादास काळे (दोघे रा. दुधसागर सोसायटी, गल्ली नंबर तीन, केडगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सोनार व्यावसायिकाने फिर्यादीत म्हटले आहे की, 2012 साली व्यवसायाच्या ओळखीमुळे शितल काळे हिच्याशी संपर्क आला आणि ओळख पुढे वाढत गेली. वेळोवेळी फोनवरून आणि प्रत्यक्ष भेटीव्दारे दोघांत प्रेमसंबंध प्रस्थापित झाले. पुढे शितल हिने भावनिक ओलावा निर्माण करून शारिरीक संबंध प्रस्थापित केले आणि नंतर हे संबंध गुप्त व्हिडीओ व फोटोंच्या आधारे ब्लॅकमेलिंगसाठी वापरण्यात आले. दरम्यान, याच फोटो आणि व्हिडीओंच्या आधारे धमकावून वेळोवेळी पैशांची मागणी करण्यात आली. पार्लर उघडण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी करून सुमारे 98 हजार 812 रूपयांचे साहित्य, रोख रक्कम दिली.

तसेच दोन वेळा वेगवेगळ्या मोपेड गाड्याही घेतल्या. 2024 साली फिर्यादी यांनी स्वतःच्या पत्नीच्या नावावरील घर विकून 18 लाख रूपये मिळवले. यापैकी बहुतांश रक्कम शितल हिला दिली असून, त्या पैशातून तिने केडगाव उपनगरातील भुषणनगर भागात 43 लाखांचे घर खरेदी केले. त्या घरावरील कर्जाचे हप्तेही फिर्यादी यांनी भरण्याचे कबूल केले आहे. मार्च 2025 मध्ये हप्ता न भरल्यावर शितल हिने पुन्हा धमकावणे सुरू केले. आजपर्यंत फिर्यादी यांनी ऑनलाईन पध्दतीने पाच लाख 47 हजार 814 रुपये व रोख स्वरूपात 22 लाख आठ हजार 348 रुपये, तसेच दोन मोपेड गाड्या असे एकूण अंदाजे 27 लाख 56 हजार 162 रुपये शितल व तिच्या नवर्‍याला दिल्याचा गंभीर आरोप फिर्यादीत केला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles