Thursday, March 5, 2026

नगर शहरात सकाळी कचरा गोळा करणारी महिला करायची घरफोडी

अहिल्यानगर-शहरात सकाळच्या वेळी कचरा गोळा करण्याच्या बहाण्याने घरफोडी चोरी करणार्‍या एका महिलेला स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले असून तिच्याकडून दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. तिच्या ताब्यातून रोख रक्कम व पितळी भांडी असा एकूण 28 हजार 100 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आनंद रतीलाल मुथा (रा. नवीपेठ, सध्या रा. परदेशी गल्ली, अहिल्यानगर) यांच्या घरात 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.30 ते 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात इसमाने घराचा कडीकोयंडा व कुलूप तोडून प्रवेश केला. घरातील कपाटाचे लॉकर फोडून रोख रक्कम, चांदीच्या वस्तू व पितळी भांडी असा सुमारे 73 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला होता. या प्रकरणी आनंद मुथा यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहरातील घरफोडीचे न उघड गुन्हे तातडीने उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली.

उपनिरीक्षक अनंत सालगुडे तसेच पोलीस अंमलदार सुनील पवार, शाहीद शेख, गणेश धोत्रे, फुरकान शेख, महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे व ज्योती शिंदे यांचा पथकात समावेश होता. पथकाने घटनास्थळी भेट देऊन तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. 26 फेब्रुवारी रोजी मिळालेल्या माहितीनुसार सकाळी कचरा गोळा करणारी सविता अर्जुन कुचेकर (वय 42, रा. नालेगाव) हिने सदर घरफोडी केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तिच्या राहत्या घरी जाऊन तिला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तिने सदर गुन्ह्याची कबुली दिली. अधिक तपासादरम्यान तिने अशाच प्रकारचा आणखी एक गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले असून कोतवाली पोलीस ठाण्यातील गुन्हा उघडकीस आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles