अहिल्यानगर एमआयडीसीत तरुणावर कोयत्याने हल्ला करून अपहरण

तरुणावर कोयत्याने हल्ला करून अपहरण
अहिल्यानगर ः एमआयडीसी भागातील क्रॉम्प्टन कंपनीसमोर भरदुपारी एका तरुणावर जीवघेणा हल्ला करून त्याचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी अक्षय दत्तात्रय गवळी (वय २९, रा. नवनागापूर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास प्रवीण ज्ञानदेव मोरे हा तरुण राजामाणूस एंटरप्राइजेस जवळ असताना, आरोपी संजय ठोंबरे (रा. आदर्शनगर), सत्यम कासार, आलोक चारोडे (दोघे रा. अस्तगाव, ता. पारनेर) आणि एका अनोळखी इसमाने संगनमत करून त्याच्यावर हल्ला केला. आरोपींनी प्रवीणला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या ताब्यातील चारचाकी गाडीने (एमएच १६ डीसी ६६९१) जोराची धडक दिली.या अपघातानंतर आरोपींनी प्रवीणवर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले. एवढ्यावरच न थांबता, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रवीणला आरोपींनी जबरदस्तीने गाडीत टाकून पळवून नेले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

 

अहिल्यानगर: नागापूर परिसरातील कृष्णाई निवास भागात राहणार्‍या एका ६० वर्षीय ज्येष्ठाला आणि त्यांच्या कुटुंबाला जुन्या वादाच्या कारणावरून शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एका तरुणासह दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी रमेश नाथाजी आणि त्यांचे कुटुंबीय घरात असताना आरोपी रूपाली विकी जगधने, दिपाली कांबळे आणि आकाश कांबळे तिथे आले. यावेळी रूपाली जगधने हिने फिर्यादीच्या मुलीमुळे संसार मोडल्याचा आरोप करत वाद घालण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपींनी फिर्यादीच्या शर्टची कॉलर पकडून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याच दरम्यान आकाश कांबळे याने आपल्या हातातील लाकडी काठीने रमेश नाथाजी यांच्या कपाळावर जोरात प्रहार करून त्यांना जखमी केले. तसेच फिर्यादीची पत्नी आणि मुलालाही आरोपींनी अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर घाबरलेल्या कुटुंबाने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

 

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles