नगर शहरात शिक्षण घेणार्या पाथर्डी तालुक्यातील तरुणीची ओळख मोबाईल गेम खेळताना मोहम्मद अजमल वासीम (रा. सुखपुर, जि. समस्तीपूर, बिहार) या तरुणाशी झाली. सुरुवातीला फोनवर बोलणे सुरू झाले, त्यानंतर तो अहिल्यानगरला आला आणि दोघे काहीवेळा शहरातील विविध ठिकाणी भेटले. त्या तरूणाने तरूणीवर वारंवार अत्याचार केल्याचे समोर आले आहे.अजमल वासीम याने पीडित तरुणीवर दबाव आणून तिला हॉटेलमध्ये नेले. 3 ऑगस्ट 2025 रोजी रेल्वे स्टेशनजवळील हॉटेलमध्ये तरूणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या वेळी दोघांचे फोटो काढले गेले. यानंतर 16 ऑगस्ट 2025 रोजी त्याने पुन्हा गंगा उद्यानात बोलावून भेट घेतली आणि नंतर स्वतःच्या रूमवर घेऊन गेला. त्यावेळीही मोबाईलमध्ये फोटो काढले गेले. 12 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी अजमल वासीम याने तरुणीला फोन करून पुन्हा भेटण्यासाठी रेल्वे स्टेशनला बोलावले. तरुणीने नकार दिल्यावर, त्याने तुझे फोटो व्हायरल करीन अशी धमकी दिली.
अजमल वासीम याने पीडित तरुणीवर दबाव आणून तिला हॉटेलमध्ये नेले. 3 ऑगस्ट 2025 रोजी रेल्वे स्टेशनजवळील हॉटेलमध्ये तरूणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या वेळी दोघांचे फोटो काढले गेले. यानंतर 16 ऑगस्ट 2025 रोजी त्याने पुन्हा गंगा उद्यानात बोलावून भेट घेतली आणि नंतर स्वतःच्या रूमवर घेऊन गेला. त्यावेळीही मोबाईलमध्ये फोटो काढले गेले. 12 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी अजमल वासीम याने तरुणीला फोन करून पुन्हा भेटण्यासाठी रेल्वे स्टेशनला बोलावले. तरुणीने नकार दिल्यावर, त्याने तुझे फोटो व्हायरल करीन अशी धमकी दिली.


