Friday, February 20, 2026

अहिल्यानगर शहरात सावेडी उपनगरात युवकावर मध्यरात्री बंदुकीतून गोळीबार! पाच जणांविरोधात गुन्हा…..

अहिल्यानगर शहरात सावेडी उपनगरात युवकावर मध्यरात्री बंदुकीतून गोळीबार!

भीमराज आव्हाडसह पाच जणांविरोधात गुन्हा, युवकावर मध्यरात्री बंदुकीतून गोळीबार!

अहिल्यानगर- गुन्हेगारीने शहराचा कौल गाठला आहे का? २ जूनच्या मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास तपोवन रोडवरील इंडो आयरिस हॉस्पिटलजवळ एका युवकावर थेट गोळीबार झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. प्रमोद रामदास घोडके (वय २४, रा. तपोवन रोड) या युवकावर पाच जणांच्या टोळक्याने हल्ला केला. या घटनेत भीमराज आव्हाड याने थेट बंदुकीतून गोळी झाडल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. घटनेनंतर जखमी घोडकेने दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात राहुल सांगळे, मयूर फणसे, आकाश नसाने, कुणाल मराठे आणि भीमराज आव्हाड या पाच जणांविरोधात हत्या करण्याचा प्रयत्न, शस्त्रास्त्राचा वापर व अन्य गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर असे प्रश्नचिन्ह उभे राहते – शहरात शस्त्रं फिरतात, टोळक्यांचं बेधडक हिंसक वर्तन सुरू आहे आणि तरीही पोलिसांना याची कल्पना नाही? शहराच्या मध्यवर्ती भागात थेट गोळीबार होतो आणि पोलिस यंत्रणा केवळ कारवाईचं नाटक करते? या घटनेमुळे अहिल्यानगर शहरात कायद्याचा धाक उरला आहे का, यावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

सध्या तोफखाना पोलीस पुढील तपास करत असून, आरोपींना अटक झाली की नाही, याबाबत प्रशासनाकडून ठोस माहिती मिळालेली नाही. घटनास्थळावर पोलिसांचा उशिरा पोहोचलेला प्रतिसाद देखील नागरीकांमध्ये संतापाचा विषय ठरतो आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles