Friday, October 31, 2025

आधार कार्ड अपडेट करणं महागलं, नवे दर लागू, जाणून घ्या दरपत्रक

आधारमधील माहितीमध्ये दुरुस्ती किंवा आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आता अधिक शुल्क द्यावं लागेल. यूआयडीएआयनं 1 ऑक्टोबरपासून नवे दर लागू केले असून ते 30 सप्टेंबर 2028 पर्यंत लागू असतील.आधार अपडेट संदर्भातील वाढवलेलं शुल्क फक्त नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल अपडेट करणं यावर लागू असेल. याशिवाय बोटांचे ठसे, डोळ्यांचं स्कॅनिंग म्हणजेच बायोमेट्रिक अपडेटसाठी लागू असेल. मात्र, लहान मुलांसाठी बायोमेट्रिक अपडेट मोफत असेल.डेमोग्राफिक म्हणजेच नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल आणि ईमेल यासारखी माहिती अपडेट करण्याची फी आता 50 रुपयांऐवजी 75 रुपये असेल.तुम्ही जर हे अपडेट बायमेट्रिकसह केलं तर अतिरिक्त शुल्क द्यावं लागणार नाही. बायोमेट्रिक अपडेटसाठी म्हणजेच बोटांचे ठसे, आयरिस स्कॅन यासाठी 125 रुपये शुल्क आकारलं जाईल. ऑक्टोबर 2028 पासून ते शुल्क 150 रुपये होईल.कागदपत्र अपडेट करण्याची सुविधा myAdhaar पोर्टलवर 14 जून 2026 पर्यंत मोफत असेल. त्यानंतर एनरोलमेंट सेंटरवर जाऊन अपडेट करण्यासाठी 75 रुपये द्यावे लागतील. याचं शुल्क पूर्वी 50 रुपये होतं.ईकेवायसी किंवा दुसऱ्या टूल्सच्या आधारे आधार प्रिंट आऊट काढण्यासाठी पहिल्या टप्प्यात 40 रुपये दुसऱ्या टप्प्यात 50 रुपये द्यावे लागतील. जर एखादा व्यक्ती नोंदणी केंद्रात जाऊन आधार नोंदणीसाठी घरी भेट दिल्यास जीएसटीसह 700 रुपये लागतील. अधिक व्यक्तींचं आधार नोंदवायचं असेल पहिल्या व्यक्तीसाठी 700 त्यानंतरच्या 350 शुल्क आकारलं जाईल.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles