Tuesday, March 10, 2026

जलसंधारण उपविभागीय अधिकाऱ्यांने घरात बसून घेतली ऑनलाईन लाच

वैजापूर येथील जलसंधारण उपविभागीय अधिकारी निखिल अशोक कवाडे याने आपल्या राहत्या घरी ऑनलाईन 7 हजार रुपयांची लाच घेतली. खाजगी वाहनाचे बिल तयार करण्यासाठी तक्रारदाराकडे दहा हजाराची लाच मागण्यात आली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कवाडे यांच्या घरी जाऊन कारवाई करत त्याला रंगेहात पकडले.

या प्रकरणातील तक्रारदार यांची टूर अँड ट्रॅव्हल्स एजन्सी असून ते भाडेतत्त्वावर गाड्या देतात. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांना ते वाहने पुरवतात. वैजापूर येथील उपविभागीय जलसंधारण अधिकारी यांनाही संबंधित तक्रारदाराने बोलेरो ही गाडी मासिक भाडेतत्त्वावर दिली होती.

त्याचे बिल काढण्यासाठी तसेच एम बी बुक लॉग तयार करून तयार बिलावर सही करून घेण्यासाठी ते मुख्य कार्यालयात पाठविण्यासाठी निखिल कवाडे यांनी दहा हजार रुपयाची मागणी तक्रारदाराकडे केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला ही माहिती देत तक्रार नोंदवली.

अॅन्टी करप्शन विभागाच्या पथकाने सापळा रचला. शनिवारी (ता.7) सुट्टी असताना कवाडे याने ऑनलाईन 7 हजार रुपयांची लाच स्वीकारली आणि तो पथकाच्या सापळ्यात अडकला. लाच घेताच पथकाने निखिल कवाडे याला ताब्यात घेतले. त्याचा मोबाईल जप्त करत लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक बाळासाहेब शिंदे यांच्या फिर्यादीवरून वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles