विहीर बांधकामाच्या बिलावर सहीसाठी ग्रामसेवक लाच घेताना पकडला ;ACB चा सापळा यशस्वी

परळीमध्ये एका लाचखोर ग्रामसेवकाला लाच घेताना ACB ने रंगेहाथ पकडलं. विहीर बांधकामाच्या बिलावर सही करण्यासाठी या ग्रामसेवकाने लाच घेतल्याचे समोर आले. याप्रकरणी ग्रामसेवकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या घटनेने गावात खळबळ उडाली असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.मिळलेल्या माहितीनुसार, दशरथ देविदासराव गोरे असे या ग्रामसेवकाच नाव आहे. तक्रारदाराच्या विहीर बांधकामाच्या बिलावर सही करून ते मंजूर करण्यासाठी गोरे यांनी एक हजार रुपये मागितले. तडजोडी अंती गोरे यांनी ५०० रुपये तक्रारदाराकडे मागितले. सदर तक्रारदाराने याबद्दल पोलिसांत तक्रार दाखल केली.

ACB ने याची दखल घेत तक्रार दाराची माहिती पडताळण्यासाठी सापळा रचला. या सापळ्यात गोरे अडकले. लाचेची मागणी पंचायत समिती परिसरात करण्यात आली होती. ACB ने दशरथ देविदासराव गोरे यांना ठरल्याप्रमाणे रक्कम स्वतःच्या खासगी कार्यालयात स्वीकारताना रंगेहात पकडले.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बीड येथील पोलीस निरीक्षक कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गोरे यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles