Sunday, December 7, 2025

शेवगाव तालुक्यावर शोककळा…… तिरुपतीला गेलेल्या तिघांचा अपघाती मृत्यू

तिरुपतीला गेलेल्या तिघांचा अपघाती मृत्यू
आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात कार उलटली
शेवगाव : येथील महाविद्यालयीन तरुण आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी येथे देवदर्शनासाठी गेले होते. कारने परत गावी येत असताना त्यांच्या कारला मंगळवारी अपघात झाला. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला. या घटनेत एक युवक गंभीर जखमी आहे.
संबंधितांच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील उरवकोंडा परिसरात कार उलटून सदर अपघात झाला आहे. या अपघातात सौरभ विष्णू अकोलकर (रा. हातगाव, ता. शेवगाव), तुषार सुनील विखे (रा. मिरी रोड, सोनविहार, ता. शेवगाव), श्रीकांत थोरात (विद्यानगर, शेवगाव) हे तिघे मृत झाले आहेत.सुमित अकोलकर हा युवक गंभीर जखमी झाला आहे. परराज्यांत सदरचा अपघात घडल्याने अधिकची माहिती समजू शकली नाही. अपघात घडला त्या भागातील स्थानिक भाषेतील एका वृत्तवाहिनीने या अपघाताचे वृत्त दिले. त्यामुळे या दुर्दैवी घटनेचे वृत्त समोर आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच संबंधितांचे नातेवाईक घटनास्थळी रवाना झाले आहेत.

या दुर्दैवी दुर्घटनेमुळे शेवगाव तालुक्यावर शोककळा पसरली आहे. अपघाताचे वृत्त समजतात संबंधित तरुणांचे नातेवाईक तसेच मित्रपरिवार घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles