Thursday, February 19, 2026

अहिल्यानगर एमआयडीसीत.कंपनीच्या उद्योजकाकडुन खंडणी घेणारा आरोपी जेरबंद

अहिल्यानगर एम.आय.डी.सी. येथे कंपनीच्या उद्योजकाकडुन खंडणी घेणारा
आरोपी जेरबंद.

प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, दिनांक 09/02/2026 रोजी 09/30 वा.चे सुमारास निंबळक एम.आय.डी.सी प्लॉट नं. 07 व 08 येथे सुयश मेटल प्रोसिंग्स प्रा. लि. येथे अखिल भारतीय कामगार सेनेचे भाऊसाहेब उर्फ सदानंद दयानंद उनवणे, राजेश पाटील व त्याचे इतर 4 अनोळखी इसमांनी बेकायदेशीरपणे कंपनीमध्ये प्रवेश करुन, कंपनीचे मॅनेजर प्रकाश जनार्दन कोकाटे यांना शिवीगाळ व दमदाटी करुन काम बंद करण्यास लावुन काम चालु करायेच असेल, तर दर महिन्याला एक लाख रुपये द्यावे लागतील, अन्यथा तुला व तुझ्या मालकाला जिवे ठार मारुन टाकु असे म्हणुन खंडणी मागुन मॅनेजर प्रकाश कोकाटे यांचेकडुन दमदाटी करुन वीस हजर रुपयेची खंडणी घेतली. तसेच त्यांनी सर्व कामगारांना बोलवुन त्यांचे अखिल भारतीय कामगार संघटनेस मान्यता देणेबाबत चिथावणी दिली होती.
त्यानंतर निंबळक एम.आय.डी.सी येथील कंपनीचे उद्योजकांनी सदर घटनेबाबत मा. श्री सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांची प्रत्यक्ष भेट घेवुन संबंधीत इसमाविरुध्द कारवाई करणे बाबत निवेदन दिले. तसेच “मा. मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्र राज्य यांनी एम.आय.डी.सी मधील कंपनीचे उद्योजकांना कोणी त्रास देत असले, तर त्यांना कायद्याने ठोकुन काढा ” असे अहिल्यानगर जिल्हा दौ-याचे वेळी सुचना दिली होती.
त्याप्रमाणे मा. पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी निंबळक एम.आय.डी.सी. येथे सुयश मेटल प्रोसिंग्स प्रा. लि.या कंपनीकडुन दमदाटी करुन खंडणी घेतलेल्या अखिल भारतीय कामगार सेनेचे भाऊसाहेब उर्फ सदानंद दयानंद उनवणे, राजेश पाटील व त्याचे इतर 4 अनोळखी इसमांविरुध्द गुन्हा दाखल करणे बाबत आदेश दिल्याने वरील आरोपीविरुध्द एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन गु.र.नं. 118/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 308(5), 308(4), 329(4), 189(2), 191(2), 190, 325, 351(2), 324(3) प्रमाणे गुन्हा करण्यात आला आहे.
त्यानंतर सदर गुन्ह्यातील आरोपी नामे भाऊसाहेब उर्फ सदानंद दयानंद उनवणे रा. एम.आय.डी.सी.,अहिल्यानगर याला ताब्यात घेवुन त्यास सदर गुन्ह्यात अटक करुन त्याची 4 दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास चालु आहे.
आरोपी नामे भाऊसाहेब उर्फ सदानंद दयानंद उनवणे याचेविरुध्द खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles