अहिल्यानगर मधील बहुचर्चित गामा भागानगरे खुन प्रकरणातील आरोपीचा मृत्यू

अहिल्यानगर – नगर शहरातील बहुचर्चित ओंकार उर्फ गामा भागानगरे खुन प्रकरणातील संशयित आरोपी बबलू उर्फ संतोष अविनाश सरोदे (वय ४७, रा.जाधवमळा, बालिकाश्रम रोड) याचा १० फेब्रुवारी रोजी सकाळी खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे.

शहरातील बालिकाश्रम रस्त्यावर जाधव मळा परिसरात १९ जून २०२३ रोजी मध्यरात्री ओंकार उर्फ गामा भागानगरे याचा तलवारीने वार करत खुन करण्यात आला होता. या खुन प्रकरणात गणेश केरूप्पा हुच्चे, नंदू बोराटे, संदीप गुडा, सागर गुडा, रवी नामदे, वैभव हुच्चे, अनिकेत साळुंके, ओम हुच्चे आणि बबलू उर्फ संतोष सरोदे या आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. यातील बबलू सरोदे याला काही दिवसांपूर्वी न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.

तो जामिनावर बाहेर असताना त्याला गंभीर आजाराने ग्रासले होते. त्यामुळे त्याच्यावर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार घेत असताना १० फेब्रुवारी रोजी सकाळी त्याचा मृत्यू झाला. त्याच्यावर दुपारी नालेगाव येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात १ भाऊ, भावजय, २ बहिणी असा परिवार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles