Friday, March 6, 2026

अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार असतानाही आरोपीचे स्वतःच्या घरात वास्तव्य :पोलिसांची कारवाई

अहिल्यानगर- जिल्हयातुन हद्दपार असलेल्या सराईत गुन्हेगारावर एमआयडीसी पोलीसांनी कारवाई केली आहे.
सपोनि माणिक चौधरी यांना बातमी मिळाली की, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्याकडील हद्दपार संदर्भ क्रमांक स्था.गु. शा/हद्दपार/55/एमआयडीसी ह. प्रस्ताव क्रमांक 2/5366/2025 अहिल्यानगर दि.07/11/2025 अन्वये महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 55 मधील अहिल्यानगर जिल्हयातुन हद्दपार असलेला इसम मुनाफ चाँद शेख, रा. जेऊर बायजाबाई, ता.जि अहिल्यानगर हा त्याच्या राहते घरी वरील आदेशाचा भंग करुन, कोणतीही परवानगी न घेता वास्तव्यास आलेला आहे.

सपोनि चौधरी यांनी पोहेकॉ राजु सुद्रीक, पोकॉ दिपक फुंदे, चापोकॉ राहुल ढाकणे यांचे पथक करुन त्यांना हद्दपार इसमाचा त्याच्या राहत्या घरी शोध घेवून कारवाई करणेबाबत आदेशीत केले व पथकास रवाना केले. त्यानंतर पथकातील अमंलदार यांनी दि.05/03/2026 रोजी नमुद ठिकाणी जावुन खात्री केली असता मुनाफ चाँद शेख, वय 45 वर्षे, रा. जेऊर बावजाबाई, ता.जि अहिल्यानगर हा त्याच्या राहते घरी मिळून आला. सदर हद्दपार इसम यास ताब्यात घेवुन त्याचेवर पोकॉ दिपक रामदास फुंदे यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन एम.आय.डी.सी पोलीस स्टेशन गुरनं 171/2026 महाराष्ट्र पोलीस अधिनीयम 1951 चे कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात आलेली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles