सोनई, श्रीरामवाडी शिवारात गावठी कट्टा (अग्निशस्त्र) बाळगणा-या आरोपीविरुध्द स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, 01 गावठी कट्टा व 02 जिवंत काडतुसे हस्तगत.
–
मा. श्री सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत.
सदर आदेशानुसार श्री किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/ अनंत सालगुडे पोलीस अंमलदार बिरप्पा करमल, सोमनाथ झांबरे, बाळासाहेब नागरगोजे, किशोर शिरसाठ, प्रशांत राठोड, महिला पोलीस अंमलदार सोनल बागवत चालक उमाकांत गावडे, महादेव भांड तसेच दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर, उमेश खेडकर नेम. सायबर पोलीस स्टेशन यांचे पथक तयार करुन सदर पथकास सोनई पोलीस हद्दीमध्ये अवैध शस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत पथकास सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना केले होते.
दिनांक 26/03/2026 रोजी नमुद पथक हे सोनई पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध शस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत इसम नामे अमोल रावसाहेब विटनोर रा. मांजरी ता. राहुरी हा सोनई ते खेडले परमानंद जाणारे रोडवर श्रीरामवाडी परिसरात कॅनलवर त्याचे कब्जात विनापरवाना अग्निशस्त्र बाळगुन थांबलेला असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पथकाने बातमीतील ठिकाणी सोनई ते खेडले परमानंद जाणारे रोडवर श्रीरामवाडी परिसरात जावुन खात्री करता एक इसम कॅनलवर संशयीरित्या बसलेला दिसुन आला. सदर इसमास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नांव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नांव अमोल रावसाहेब विटनोर वय-27 वर्षे, रा. मांजरी ता. राहुरी जि. अहिल्यानगर असे असल्याचे कळविले. सदर इसमाची झडती घेतली असता त्याचे कमरेला 1) 30,000/- रुपये किमतीचे एक गावठी पिस्टल (अग्निशस्त्र), 2000/-रु कि. चे दोन जिवंत काडतुसे, असा एकुण 32,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने जप्त करण्यात आला आहे.
ताब्यात घेण्यात आलेला इसम नामे अमोल रावसाहेब विटनोर याचेकडे मिळुन आलेल्या अग्निशस्त्र व काडतुसाबाबत विचारपुस करता त्याने मिळुन आलेले अग्निशस्त्र व काडतुसे विक्री करीता आणले असल्याचे सांगितले.
अमोल रावसाहेब विटनोर रा.मांजरी ता. राहुरी जि. अहिल्यानगर याचेविरुध्द यापुर्वी सोनई पोलीस ठाणे गु.र.नं. 86/2026 आर्म ऍ़क्ट 3/25, 7 प्रमाणे गुन्हा दाखल असुन तो सदर गुन्ह्यात फरार होता.
ताब्यातील इसमाविरुध्द पोहेकॉ/437 सोमनाथ आसमानराव झांबरे नेम – स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचे फिर्यादीवरुन सोनई पोलीस ठाणे गु.र.नं.102/2026 आर्म ऍ़क्ट 3/25, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सोनई पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
नेवासा तालुक्यातील गावठी कट्टा 2 जिवंत काडतुसे बाळगणा-या आरोपीविरुध्द कारवाई
- Advertisement -


