शेवगावात वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई; 5.10 लाखांचा ट्रॅक्टर-वाळू जप्त
मा. श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे आदेशान्वये पोनि/श्री. संतोष मुटकुळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि/हरिष भोये, पोलीस अंमलदार बाळासाहेब नागरगोजे, बाळासाहेब खेडकर, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, किशोर शिरसाठ, महिला पोलीस अंमलदार किरण ठुबे यांचे पथक तयार करून अवैध वाळू उपसा व वाहतूक करणारे इसमांविरुद्ध कारवाई करणेकामी रवाना केले.
दिनांक 02/07/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करून अवैध धंद्याची माहिती काढत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत शेवगाव शहरामध्ये लाडेवस्ती जवळ नाणी नदीमधून ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळूची चोरटी वाहतूक चालू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने शेवगाव ते लाडेवस्ती रोड चौफुलीवरती सापळा लावून थांबले असता एक ट्रॅक्टर येतांना दिसून आले. तेव्हा पथकाने सदर ट्रॅक्टर थांबवून चालकास ताब्यात घेऊन त्याचे नांव गाव विचारले असता त्याने त्याचे नांव 1) कृष्णा दगडू धनवडे, वय-30 वर्षे, रा. शेवगाव ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले.
आरोपीचे कब्जातून 10,000/- रु किंमतीची 1 ब्रास वाळू, 5,00,000/- रु किंमतीचा एक विना नंबरचा स्वराज 744 कंपनीचा ट्रॅक्टर असा एकूण 5,10,000/- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
ताब्यातील आरोपीविरुद्ध शेवगाव पोलीस ठाणे गु.र.नं. 554/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शेवगाव पोलीस ठाणे करीत आहे.
सदरची कारवाई श्री. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.


