Friday, February 20, 2026

नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील गुन्हेगारी टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

नगर – संघटीतपणे दरोडा, जबरी चोरी, घरफोडी व चोरी करणाऱ्या गुन्हेगारी टोळीवर अहिल्यानगर पोलीस दलाने मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे. या कारवाईने सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

दि.२५ जानेवारी २०२५ रोजी पारनेर पोलीस ठाणे हद्यीतील पठारेवस्ती सोबलेवाडी या ठिकाणी फिर्यादीच्या राहत्या घराचा दरवाजा तोडून अनोळखी चोरट्यांनी घरात प्रवेश करून लोखंडी सळई व लाकडी दांडक्याने फिर्यादी व साक्षीदार यांना दमदाटी करुन साक्षीदार यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने बळजबरीने ओरबडून घेवुन साक्षीदार यांना दुखापत केली . फिर्यादीच्या घरात उचकापाचक करुन रोख रक्कम तसेच मोटरसायकल असा एकुण २,७५,००० रु कि.चा ऐवज दरोडा टाकुन चोरुन नेला. फिर्यादीचा मोबाईल हॅन्डसेट फोडुन नुकसान केल्या प्रकरणी पारनेर पोलीस स्टेशनमध्ये रजिनं । ६३/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (६),३२४ (४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता,
सदर गुन्हा (१) सिध्देश सादीश काळे (२) अजय सादीश काळे (३) धिरज सादीश काळे (४) नागेश विक्रम भोसले (५) गणेश सुरेश भोसले (६) बाळू झारु भोसले (७) आवडया सुभाष उर्फ टुब्या भोसले (८) श्रीहरी हरदास चव्हाण (९) देवीदास जैनू काळे व विधीसंघर्षीत बालक यांनी केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते .त्यावरुन काही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.
सदर आरोपींच्या टोळीने अहिल्यानगर जिल्हयातील पारनेर, सुपा, एम.आय.डी.सी, भिंगार कॅम्प व बेलवंडी पोलीस ठाणे हद्यीत घडलेल्या दरोडा, जबरी चोरी, घरफोडी व चोरी अशा विविध गुन्हयांची कबुली दिली होती त्यावरुन सदर आरोपींच्या टोळीविरुध्द विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परीक्षेत्र नाशिक यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम कायद्यान्वये गुन्हयात कलमवाढ करुन गुन्हयाचा सखोल तपास करुन आरोपींविरुद्ध सबळ पुरावा प्राप्त करुन या टोळीविरुध्द अपर पोलीस महासंचालक सो, (का.व.सु), महाराष्ट्र राज्य यांचे पुर्वपरवानगीने मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र सादर करुन आरोपी नागेश विक्रम भोसले व त्याच्या साथीदार टोळीविरुध्द मोक्का कायद्यान्वये यशस्वी कारवाई करण्यात आलेली आहे.
आरोपी नागेश विक्रम भोसले व त्याचे साथीदार यांच्या टोळीविरुध्द अहिल्यानगर व पुणे जिल्हयात संघटीतपणे दरोडा, जबरी चोरी घरफोडी व चोरी यासारखे एकुण १६ गुन्हे दाखल होते .त्यांच्यापासुन जनसामान्यांच्या जिवीतास व मालमत्तेस धोका निर्माण झाला होता. त्यामुळे या गुन्हेगारी टोळीविरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम कायद्यान्वये यशस्वी कारवाई करण्यात आलेली आहे.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल भारती तात्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी, अहिल्यानगर ग्रामीण विभाग व शिरीष वमने, उपविभागीय पोलीस अधिकारी, अहिल्यानगर ग्रामीण विभाग, श्री. किरणकुमार कबाडी, पोलीस निरीक्षक, स्थागुशा, समीर बारवकर, पोलीस निरीक्षक, पारनेर पोस्टे, अभय दंडगव्हाळ, सहा. पोलीस निरीक्षक, पारनेर पोस्टे, पोहेकॉ रवींद्र पांडे, पोकॉ निखिल मुरुमकर, पोकॉ अभिजीत बोरुडे, पोकॉ सचिन वीर, पोकॉ विवेक दळवी यांच्या पथकाने केलेली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles