Saturday, February 21, 2026

अहमदाबाद विमान दुर्घटनेत वहिनीच्या निधनानंतर आदिती तटकरेंची भावनिक पोस्ट; म्हणाल्या,

अहमदाबाद येथे एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान कोसळून झालेल्या भीषण अपघातात २७४ जणांचा मृत्यू झाला आहे. विमानाने अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच हे विमान कोसळले. या दुर्घटनेनंतर देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

या दुर्घटना झालेल्या विमानात २४२ जण प्रवास करत होते, ज्यापैकी २३० हे प्रवासी, दोन वैमानिक आणि १० क्रू मेंबर्स होते. यापैकी २४१ जणांचा मृत्यू झाला आहे तर एका व्यक्तीचा जीव वाचला आहे. बचावलेला व्यक्ती हा मूळ भारतीय असलेला ब्रिटीश नागरिक आहे. दरम्यान या अपघातात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या आत्ये वहिनी अपर्णा महाडिक यांचे देखील निधन झाले आहे. अदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात एक भावनिक पोस्ट केली आहे.अदिती तटकरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये अपघाताच्या काही दिवस आधी त्यांच्या वहिनींशी झालेल्या भेटीबद्दल माहिती दिली आहे. “आमच्या कुटुंबातील सदस्य, माझ्या आत्ये वहिनी तथा एअर इंडियाच्या वरिष्ठ क्रू मेंबर सुपरवायझर अपर्णा महाडिक यांचे अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान अपघातात दुःखद निधन झाले. अवघ्या काही दिवसांपूर्वी आम्ही सगळे कुटुंबिय भेटलो होतो, त्यावेळी आयुष्याच्या अनिश्चिततेवरही आम्ही बोललो. ही अनिश्चितता काही दिवसांतच आमच्या कुटुंबाला अनुभवावी लागेल असे स्वप्नातही वाटले नव्हते,” असे आदिती तटकरे म्हणाल्या आहेत.

https://x.com/iAditiTatkare/status/1933796971363320111

“कर्तव्यपरायणता, विनम्रता आणि आत्मीयता ही अपर्णा वहिनींच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये होती. त्यांच्या अकाली निधनाने आमच्या कुटुंबातील एक मनमिळाऊ सदस्य, आणि समाजातील एक स्वावलंबी, कर्तबगार स्त्री काळाच्या पडद्याआड गेली आहे,” अशी भावनाही आदिती तटकरे यांनी यावेळी बोलून दाखवली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles