कृषीमंत्री होताच दत्तात्रय भरणेचा फैसला; आता कर्जमाफीची लवकरच घोषणा …..

देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात थोडा फेरबदल करण्यात आला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांना कृषिमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पण हे जबाबादारी स्वीकारण्याआधीच कृषिमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर प्रश्न विचारण्यात आला. दत्ता भरणे यांना कृषिमंत्रिपदाची लॉटरी लागल्यानंतर इंदापूरमध्ये जल्लोष करण्यात आला. दत्ता भरणे यांनी प्रसारमाध्यमांशी सवांद साधत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्‍यांचे आभार मानले.कृषी खात्याचे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी खाते बदल करण्यात आल्याचे बोलले जाते आहे. आता कर्जमाफीची लवकरच घोषणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना, अजून या खात्याचा आपण पदभार स्वीकारला नाही. कर्जमाफीविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार ही मंडळी योग्य तो निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

आज कृषीमंत्र्याची जबाबदारी मिळताच दत्तात्रय भरणे यांनी पहिला संकल्प सोडला. त्यांनी त्यांचे इंदापूरविषयीचे प्रेम व्यक्त केले. त्यांचा मनोदय व्यक्त केला. “मी शेतकरी कुटुंबातील असून मला बारामतीकरांनी (अजितदादांनी) भरभरून दिलं. पवार कुटुंबाचं माझ्यावर भरभरून प्रेम राहिलं आहे. विशेषतः अजितदादांनी भरभरून दिले. आता इंदापूर बारामतीसारखं कसं होईल यासाठी प्रयत्न करणार.” असा मनोदय दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला. बारामतीसारखी इंदापूरची प्रगती साधण्याचा संकल्प त्यांनी सोडला

शेतकरी कुटुंबात जन्मलो, वाढलो आणि शेतीच्या प्रत्येक पैलूचा अनुभव घेतला आहे. म्हणूनच शेतकऱ्यांचे दु:ख, अडचणी आणि अपेक्षा मला अंतःकरणाने समजतात. आता मंत्रीपदाच्या जबाबदारीतून मला त्यांच्या न्यायासाठी, हक्कासाठी आणि प्रगतीसाठी काम करण्याची संधी मिळाली आहे. शेतकऱ्यांचा सन्मान, शाश्वत शेती आणि ग्रामीण समृद्धी हे माझे मुख्य उद्दिष्ट राहील. शासनाच्या प्रत्येक धोरणामध्ये शेतकऱ्यांचा आवाज पोहोचवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन, असे दत्ता भरणे म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles