नगर – विक्री करता आणलेला 11.083 किलो ग्रॅम गांजासह एकुण 13,70,500 रुपये किंमतीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला आहे.
अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे नोडल अधिकारी तथा स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.किरणकुमार कबाडी यांनी शेवगांव उपविभाग हद्दीतील अंमली पदार्थ विक्री व सेवन करणाऱ्या इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत पोउपनि अनंत सालगुडे, पोहेकॉ अतुल लोटके, पोहेकॉ संतोष खैरे, पोना बाळासाहेब नागरगोजे, पोना सोमनाथ झांबरे, पोकॉ किशोर शिरसाठ यांना रवाना केले. सदर पथक हे पाथर्डी पो.ठाणे हद्दीत अंमलीपदार्थाबाबत माहिती घेत असतांना, पथकास माहिती मिळाली की, 1) सतिष सुरेश डोळस रा. मावळ, पुणे, 2) राकेश सुदाम वाळुंज रा. मावळ, ता. पुणे, 3) आकाश देविदास जंगम रा. कामशेत, पुणे, 4) सतिष कृष्णकुमार बिडलांग रा. कारला, मावळ, पुणे हे त्यांच्याकडील काळ्या रंगाच्या स्कॉर्पीओ गाडी क्रमांक एम.एच. 12 जे. झेड 1854 ही मधुन सुरज आसराजी छाजेड रा. बालमटाकळी, शेवगांव याच्याकडुन अंमली पदार्थ गांजा खरेदी करुन विक्री करिता शेवगांव येथुन पाथर्डी मार्गे पुणे परिसरामध्ये जाणार आहेत. त्यावेळी सदर माहिती पोनि कबाडी यांना कळविली असता त्यांनी पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या मदतीने कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या. त्यानुसार पथकाने तात्काळ पाथर्डी पोलीस ठाणे येथे येवुन पोनि श्री पुजारी यांना मिळालेल्या बातमीचा रिपोर्ट दिला त्यांनुसार पोउपनि महादेव गुट्टे, पोकॉ इजाज महेबुब सय्यद, पोहेकॉ अल्ताफ अहमद शेख यांच्यासह माळी बाभुळगांव फाटा या ठिकाणी सापळा रचुन स्कॉर्पीओ गाडी ताब्यात घेतली. या स्कॉर्पीओमधील सतिष सुरेश डोळस (वय 27 वर्षे, रा. कान्हेफाटा, इकोव्हॅली सोसायटी, सी 505, मावळ, ता. मावळ, जि. पुणे), राकेश सुदाम वाळुंज (वय – 35 वर्षे, रा. इंद्रायणी कॉलनी, कामशेत, ता. मावळ, जि. पुणे), आकाश देविदास जंगम (वय – 29 वर्षे, रा. कामशेत, ता. मावळ, जि. पुणे), सतिष कृष्णकुमार बिडलांग (वय – 33 वर्षे, रा. कारला, ता. मावळ. जि. पुणे ) यांची झडती घेतली. स्कॉर्पीओ गाडीच्या पाठीमागील डिकीमध्ये ट्रॅव्हल बॅग मिळुन आली. सदर बॅग उघडुन पाहाता आतमध्ये दोन मोठ्या प्लॅस्टीक पिशव्यामध्ये उग्र वास येत असलेला व मिश्रीत असलेला हिरवट रंगाचा पाला, फुले, बोंडे काड्या संलग्न असलेले कॅनबिस वनस्पतीचे शेंडे (अंमली पदार्थ गांजा) मिळुन आला. विचारणा केली असता, इसम नामे सतिष सुरेश डोळस यांने तो गांजा हा अंमली पदार्थ असल्याचे सांगुन तो नशेसाठी वापरला जातो. सदरचा गांजा हा सुरज आसराजी छाजेड रा. बालमटाकळी, शेवगांव, जि. अहिल्यानगर याच्याकडून खरेदी करुन विक्रीकरीता आणल्याची कबूली आरोपींनी दिल्यानंतर त्यांना ताब्यात घेवुन गांजासह 13,70,500 रुपये किमंतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला करण्यात आले आहे.
पाचही आरोपींविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेचे पोकॉ बाळासाहेब सुभाष खेडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पाथर्डी पो.ठाणे, अहिल्यानगर येथे गु.र.नं. 1103/2025 गुंगीकारक औषधीद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा सन 1985 चे कलम 8 (क),20(ब), ii(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, निरज राजगुरु, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगांव उपविभाग, जि. अहिल्यानगर, किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर आणि विलास पुजारी, पोलीस निरीक्षक, पाथर्डी पो.ठाणे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली


