Saturday, February 21, 2026

नगर शहरातील बांधकाम व्यावसायिकाने केली पुण्याच्या व्यक्तीची 17 लाख रूपयांची फसवणूक

अहिल्यानगर -शहरातील बांधकाम व्यावसायिकाने पुणे येथील बँक कर्मचार्‍याची तब्बल 17 लाख रूपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात मंगळवारी (3 जून) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फसवणूक झालेल्या रज्जाक महेबुब इनामदार (वय 54, रा. निसर्ग सोसायटी, बाणेर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. अली अकबर सलीम कुरेशी (रा. इदगाह मैदानजवळ, नागरदेवळे, ता. अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. इनामदार यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, 2016 साली अली अकबर सलीम कुरेशी याच्याशी ओळख झाली होती.

कुरेशी याने आपली आयशा कन्स्ट्रक्शन ही फर्म असल्याचे सांगून भूखंड विक्री व रो-हाऊसिंग स्कीम चालवत असल्याची माहिती दिली होती. इनामदार यांनी आलमगीर, भिंगार येथील आयशा मंजिल रो-हाऊसिंग स्कीमम मधील प्लॉट व रो-हाऊस खरेदी करण्यासाठी कुरेशीला 2 ऑगस्ट 2016 ते 29 सप्टेंबर 2016 दरम्यान 17 लाख रूपये विविध चेक्सव्दारे दिले होते. याबाबत त्यांनी कन्स्ट्रक्शन फर्मच्या लेटरपॅडवर लेखी करार केला होता. परंतु, सहा महिन्यांच्या मुदतीनंतरही मालमत्ता नोंदणी वा कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने इनामदार यांनी येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार अर्ज दाखल केला होता.

तपासादरम्यान कुरेशीने चूक मान्य करत पाच लाख रूपयांची भरपाई आणि उर्वरित 17 लाखांची परतफेड करण्यासाठी कोटक महिंद्रा बँकेचे नऊ चेक दिले. मात्र, या खात्यावर ब्लॉक असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर चेक वटले नाहीत.
त्यानंतर काही रक्कम कुरेशीने देण्याचा प्रयत्न केला, पण उर्वरित रक्कम वेळोवेळी मागूनही दिली नाही. शेवटी या प्रकाराला वैतागून इनामदार यांनी पुन्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात अर्ज दिला. अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles