Thursday, February 19, 2026

माझा पराभव ‘अहमदनगर’ या नावाने झाला, मात्र विजय ‘अहिल्यानगर’ म्हणून होणार …

अहिल्यानगर (प्रतिनिधी):
सावेडी, बोल्हेगाव, केडगाव आणि तपोवन या नव्याने विकसित होत असलेल्या चारही उपनगरांसाठी पुढील काळात एकत्रितपणे १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्च करून शहराच्या तोडीस तोड सर्वांगीण विकास करण्याचा ठाम संकल्प करण्यात येणार असल्याचे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

श्रेयस लॉन्स, तपोवन रोड येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

डॉ. विखे पाटील पुढे म्हणाले की, विकासाच्या मुद्द्यावरच थेट जनतेसमोर जाणार असून ही भूमिका कोणाच्या विरोधासाठी नाही, तर लोकांशी संवाद साधून विश्वास अधिक दृढ करण्यासाठी आहे. पराभव झाला तरी आपण पळ काढणाऱ्यांपैकी नाही. आजही नगरमध्ये प्रचाराला गेल्यावर लोक ‘खासदार’ म्हणूनच हाक मारतात, हे आपल्या कामातून कमावलेले भांडवल आहे. आज बाजारपेठेत प्रचार रॅली काढत असताना व्यापारी म्हणाले काही झाले तरी पुढचे खासदार तुम्हीच अशी भावना व्यक्त केली, असून त्यामुळे मतदान अत्यंत जपून व विचारपूर्वक करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

आपण खासदार नसताना ही आणि ढवण ताई नगरसेविका नसतानाही विकासाची दिशा ठरवली गेली होती, असे सांगत त्यांनी नमूद केले की माझा पराभव ‘अहमदनगर’ या नावाने झाला, मात्र विजय ‘अहिल्यानगर’ म्हणून होणार आहे. मी जे बोलतो ते करून दाखवतो, याचे उदाहरण देताना MIDC चौकात दोन फ्लायओव्हरचे काम सुरू असून लवकरच नवीन विळद येथे MIDC उभारली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. खासदार असताना शहरात प्रथमच CCTV कॅमेरे बसवण्याचा निर्णयही याच भूमिकेतून घेतल्याचे त्यांनी सांगितले

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles