Saturday, February 21, 2026

प्रा. भानुदास बेरड यांच्या गंध मातीचा या ग्रंथास जिल्हा मराठा चा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्रदान

प्रा भानुदास बेरड यांच्या गंध मातीचा या ग्रंथास जिल्हा मराठा चा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्रदान

छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या 142 व्या हुतात्मा दिनानिमित्त जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या श्री शिवाजी मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडार च्या वतीने राज्यस्तरीय “छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्य साहित्य पुरस्कार प्रदान सोहळा” गुरुवार दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी सकाळी नऊ वाजता, राजर्षी शाहू महाराज सभागृह न्यू आर्ट्स कॉलेज अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आला होता. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील साहित्यिकांना एकूण आठ पुरस्कार देण्यात आले. त्यामध्ये प्रा भानुदास बेरड यांनी लिहिलेल्या “गंध मातीचा” या ललित लेख संग्रह ग्रंथास हा राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला. सन्मान चिन्ह, मानपत्र, ग्रंथ, शाल व पुष्पगुच्छ, दहा हजार रुपये पुरस्कार राशी असे पुरस्काराचे स्वरूप होते. हा पुरस्कार श्री प्रेमानंद गजवी (अध्यक्ष, ९९वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन नागपूर) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर विवेक जी भापकर हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. संस्थेचे विश्वासरावजी आठरे पाटील, मुकेश जी मुळे, ॲड दीपलक्ष्मी मसे, श्री दीपक दरे, न्यूयॉर्कचे प्राचार्य दीपक जी सागडे, निवड समितीचे निमंत्रक प्रा गणेश भगत, प्रा मेघा ताई काळे, न्यू लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर एम एम तांबे, प्रा चंदनशिवे, प्रा मच्छिंद्र मालुंजकर, प्राचार्य रामदास टेकाळे, आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा बेरड यांच्या व्यतिरिक्त विद्या पोळ (बाई ग/कादंबरी), दत्ता बारगजे (फकीरी /आत्मचरित्र), डॉक्टर संजय जोशी (कथा जैवविविधतेची/ लेख संग्रह), प्रा रंजना कदम (विचार वेद/वैचारिक), किरण भावसार (घामाचे संदर्भ/कवितासंग्रह), विद्या निकम (अस्वस्थ मनाचे पडघम/ललित), ॲड नीता कचवे (छोट्या छोट्या गोष्टी जगण्याची देते दृष्टी/बाल साहित्य) इत्यादी विविध जिल्ह्यातील राज्यातून आलेल्या साहित्यिकांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles