अहिल्यानगर शहर शिवसेना ठाकरे पक्षात इन्कमिंग
प्रतिनिधी : अहिल्यानगर शहर शिवसेना ठाकरे पक्ष जोमाने कामाला लागला आहे. नवनियुक्त शहरप्रमुख किरण काळे यांनी संघटना विस्ताराचे काम हाती घेतले आहे. सावेडी उपनगरातील सामाजिक कार्यकर्ते गणेश आपरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह काळे यांच्या नेतृत्वाखाली नुकताच शहर शिवसेना ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला आहे. ज्येष्ठ शिवसैनिक सुनील त्रिपाठी यांनी पक्षाचा पंचा घालत त्यांना पक्षप्रवेश दिला.
यावेळी प्रा.अंबादास शिंदे, रावजी नांगरे, सुनील त्रिपाठी, किरण बोरुडे, प्रशांत पाटील, ऋतुराज आमले, सुजय लांडे, तुषार लांडे, गिरीधर हांडे, विकेश गुंदेचा, महावीर मुथा, दयाशंकर विश्वकर्मा, दत्तात्रय गराडे, मिलन सिंग, अनिकेत कराळे, केशवराव दरेकर, परमेश्वर बडे, अभय बडे, विठ्ठलराव फुलारी, विलास उबाळे, जयराम आखाडे, विकास भिंगारदिवे, आकाश आल्हाट, शंकर आव्हाड, अशोक जावळे, विनोद दिवटे, किशोर कोतकर, रोहित वाघमारे, बाबासाहेब वैरागर, दीपक काकडे आदी उपस्थित होते.
गणेश आपरे यांचा सावेडी उपनगरामध्ये दांडगा जनसंपर्क आहे. सन २०१८ ची सार्वत्रिक मनपा निवडणूक त्यांनी प्रभाग क्रमांक पाच मधून लढवली होती. अपक्ष लढून देखील त्यांनी चांगली मते त्यावेळी मिळवली होती. ओबीसी प्रवर्गातून येणाऱ्या आपरे यांचा मागील सुमारे दहा वर्षांहून अधिक काळ शहराच्या सामाजिक, राजकीय वाटचालीमध्ये सक्रिय सहभाग आहे.
प्रवेशानंतर बोलताना आपरे म्हणाले की, आम्ही नवीन जोमाने संघटना बांधणीच काम करणार आहे. किरण काळे यांच नेतृत्व चांगल आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना आम्हाला चांगली ऊर्जा मिळेल. आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी आम्ही शिवसेना ठाकरे पक्षाच चांगल संघटन सावेडी उपनगरामध्ये उभे करू.


