Saturday, February 21, 2026

नगर शहर शिवसेनेत इन्कमिंग…युवा कार्यकर्ते गायकवाडांचा ना. दानवेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

शहर ठाकरे शिवसेनेत इन्कमिंग…
युवा कार्यकर्ते गायकवाडांचा ना. दानवेंच्या उपस्थितीत ठाकरे शिवसेनेत प्रवेश ;

अहिल्यानगर : अहिल्यानगर शहर ठाकरे शिवसेनेमध्ये इन्कमिंग झाले आहे. सावेडी उपनगर, बोल्हेगाव, नागापूर विभागामध्ये काम करणारे धडाडीचे युवा सामाजिक कार्यकर्ते दत्ता गायकवाड यांनी आपल्या सहकाऱ्यां समवेत शिवसेना नेते तथा विधान परिषदेचे राज्याचे विरोधी पक्षनेते ना. अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत शहर प्रमुख किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला आहे. आगामी काळात युवकांच्या माध्यमातून ठाकरे शिवसेना बळकट करण्यासाठी काम करणार असल्याचे प्रतिपादन प्रवेशा नंतर बोलताना गायकवाड यांनी केले आहे.

काळे यांच्या निवासस्थानी ना. दानवे यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांशी पार पडलेल्या संवादा नंतर हा प्रवेश पार पडला. यावेळी शहर प्रमुख किरण काळे यांच्यासह जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख पप्पू भाले, दीपक भोसले, विलास उबाळे, सुनील त्रिपाठी, रावजी नांगरे, विकेश गुंदेचा, संजय वल्लाकट्टी, राजू औटी, सुनील भोसले, अहिल्यानगर शहर विधानसभा युवा अधिकारी आनंद राठोड, गौरव ढोणे, महावीर मुथा, किशोर वाघ, सचिन शेंडगे, सुजय लांडे, ऋतुराज आमले, मिलन सिंग, शंकर आव्हाड, किशोर कोतकर, गणेश आपरे, विकास भिंगारदिवे, मयूर भिंगारदिवे, जयराम आखाडे, भगवान शेंडे, दीपक काकडे, सिद्धांत भिंगारदिवे, पोपट लोंढे, भगवान शेंडे, रोहिदास भालेराव, विनोद शिरसाट, सचिन भालेराव, सचिन कापुरे यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

दत्ता गायकवाड हे सामाजिक उपक्रमांमध्ये कायम अग्रेसर असतात. वृक्षारोपण, अपंग बांधवांना मदत, रक्तदान शिबिरांच आयोजन करणे आदी अनेक समाज उपयोगी कार्यक्रमांचे त्यांनी आजवर आयोजन केले आहे. युवकांचे मोठे संघटन त्यांनी उभे केले असून आगामी काळात ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून काळे यांचे नेतृत्वाखाली अधिकाधिक युवकांना पक्षांमध्ये आणण्यासाठी काम करणार असल्याचे प्रतिपादन गायकवाड यांनी केले आहे.

किरण काळे म्हणाले की, युवा सेना प्रमुख, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षामध्ये युवकांना काम करण्यासाठी भक्कम व्यासपीठ आहे. अहिल्यानगर शहरामध्ये युवकांचे मोठे संघटन उभे करण्याचे काम आगामी काळात युवा सेनेच्या माध्यमातून केले जाणार आहे. युवा सेनेमध्ये काम करणाऱ्या तरुण शिवसैनिकांना ताकद देण्याचे काम शहर शिवसेनेच्या वतीने करण्यात येईल.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles