Ahilyanagar… तब्बल ७9 लाखांचा कापड अपहार उघड..!एलसीबीची थरारक कारवाई

अहिल्यानगर येथुन अपहार केलेले 78,82,184/- रुपये किमतीचे 470 कापडाचे रोल जप्त, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची राजस्थान राज्यामध्ये कारवाई.

प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, फिर्यादी अमरिशकुमार ओमप्रकाश गुप्ता वय-57 वर्षे रा. एफ 102 सालीन हाईट, नारोल लांभारोड, अहमदाबाद, राज्य गुजरात यांचे कंपनीतील कंटेनर गाडी क्रमांक क्रख्-27.ज्र्.5935 यावर असलेले चालक नामे संजय लिलाधर कुमार व क्लिन्नर नामे लिलु मिना उर्फ नंदलाल मिना यांनी संगनमत करुन फिर्यादीचे कंपनीचे एकुण 555 कापडाचे रोल बेंगलोर येथे घेवुन जाणे करीता विश्वासाने सोपवलेले असतांना आरोपीतांनी नमुद 470 कापडाचे रोल बेंगलोर येथे न पोहचवता ते परस्पर स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता वापरले असुन त्यांची एकुण किंमत 78,82,184/- रुपये इतकी आहे. तरी फिर्यादीच्या च्च्र्च् च्र्द्धठ्ठदद्मत्दृद च्दृथ्द्वद्यत्दृद ख्र्ख्र्घ् कंपनीच्या मालाचा अपहार करुन कंपनीची व कंपनीच्या मालकाचा विश्वासघात करुन आर्थिक अपहार केला आहे. सदर घटनेबाबत कोतवाली पोलीस ठाणे गु. र. नं. 210/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 316 (4), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
मा. श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी पो.नि. किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांना सदर गुन्ह्यातील आरोपीचे शोध घेवुन तात्काळ ताब्यात घेवुन त्यांचेकडुन मुद्देमाल हस्तगत करणे बाबत आदेशीत केलेले आहे.
पोनि श्री किरणकुमार कबाडी यांनी सदर गुन्ह्यातील आरोपीचे शोध होणेकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/संदिप मुरकुटे, पोलीस अंमलदार, सुनिल पवार, रिचर्ड गायकवाड, फुरकान शेख, भगवान थोरात, प्रशांत राठोड, विशाल तनपुरे, महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत, चालक उमाकांत गावडे अरुण मोरे यांचे पथक तयार करुन सदर पथकास गुन्ह्यातील आरोपीचे व मुद्देमालाचे शोध होणे कामी सुचना व मार्गदर्शन करुन सदरचे पथक रवाना करण्यात आले होते.
वरील पथकाने गुन्हा ठिकाणी भेट देवुन, गुन्ह्यातील आरोपींची माहिती संकलित करुन आरोपींची माहिती काढत असतांना पथकास व्यवसायीक कौशल्य व गुप्त बातमीदारामाचे मार्फत सदर गुन्ह्यातील आरोपींनी नवापुर जि. नंदुरबार या ठिकाणी वाहन उभे करुन त्यातील मुद्देमाल दुस-या वाहनात भरुन अपहार केले बाबत माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने तात्काळ नवापुर येथे जावुन तेथुन सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासले व गोपनिय माहिती प्राप्त केली. त्याठिकाणापासुन पथकाने कुठलाही विलंब नकरता तात्काळ जयपुर राजस्थान पर्यंत सलग चार दिवस सी.सी.टी.व्ही फुटेजची पाहणी केली व गुन्ह्यातील आरोपी नामे संजय लिलाधर कुमार व लिलु मिना उर्फ नंदलाल मिना यांचे शोध घेतला असता ते मिळुन आले नाही. त्यानंतर व्यवसायीक कौशल्याचे आधारे सदर गुन्ह्यातील मुद्देमाल हे इसम नामे मोहम्मद युनुस सलाउद्दीन रा. तालछापर ता. सुजानगढ, जि. चुरु राजस्थान व त्याचे साथीदार यांचेकडे लपवुन ठेवले असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने राजस्थान येथे जावुन इसम नामे मोहम्मद युनुस सलाउद्दीन रा. तालछापर ता. सुजानगढ, जि. चुरु राजस्थान याचे शोध घेतला असता इसम नामे 1) मोहम्मद युनुस सलाउद्दीन वय-49 वर्षे रा. तालछापर, ता.सुजानगढ, जि.चुरु राजस्थान, 2) बाबुलाल जिवनराम जाट वय-32 वर्षे रा. रनधिसर ता.सुजानगढ, जि.चुरु राजस्थान, 3) मोहम्मद अमिर सज्जाद वय -33 वर्षे रा. चुडीमियाँ ता.लक्ष्मणगढ, जि.सिकर राजस्थान हे मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन नमुद गुन्ह्यातील मुद्देमाला बाबत विश्वासात घेवुन विचारपुस करता वरील इसमाने सांगितले की, 4) संजय लिलाधर कुमार व 5) लिलु मिना उर्फ नंदलाल मिना यांनी अपहार केलेला मुद्देमाल हा मनोहारठाणा जि. झालवाड राजस्थान याठिकाणी लपवुन ठेवले असल्याचे सांगितले. त्यानंतर सदर ठिकाणी जावुन खात्री केली असता. मिळुन आलेल्या इसमांकडुन 78,82,184/-रु कि.चे एकुण लहान मोठे 470 कापडाचे रोल असा गुन्ह्यातील अपहार झालेला संपुर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
नमुद आरोपी व मुद्देमाल गुन्ह्याचे पुढील तपासकामी कोतवाली पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles