Monday, February 23, 2026

Ahilyanagar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर वादग्रस्त पोस्ट

अहिल्यानगर -राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी (दि.28) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. यामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. अशा परिस्थितीत संगमनेरातील शिवसेना शहरप्रमुखाने समाज माध्यमावर वादग्रस्त पोस्ट टाकल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याची तत्काळ पदावरुन हकालपट्टी देखील करण्यात आली आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर शिवसेनेचे शहरप्रमुख (शिंदे गट) दिनेश भीमाशंकर फटांगरे (रा. संगमनेर) याने समाज माध्यमावर वादग्रस्त पोस्ट टाकल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी वैशाली राऊत (रा. घुलेवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमांनुसार दिनेश फटांगरे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक इमरान खान हे करत आहे. दरम्यान, या प्रकाराने तणावाचे वातावरण निर्माण होवून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. पोलीस ठाण्याजवळ ठिय्या दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

तत्काळ पदावरुन हकालपट्टी…
संगमनेर शिवसेना शहरप्रमुख दिनेश फटांगरे याने समाज माध्यमावर वादग्रस्त पोस्ट केल्याची आमदार अमोल खताळ यांनी गंभीर दखल घेत तत्काळ कारवाईच्या सूचना दिल्या. त्यावरुन उत्तर नगर जिल्हाप्रुख कमलाकर कोते यांनी फटांगरे याची तत्काळ पदावरुन हकालपट्टी केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles