Friday, February 20, 2026

अहिल्यानगर हादरले अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन जंगलात पाच दिवस केले अत्याचार ;तीन आरोपींना अटक

अहिल्यानगर- अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. ही घटना अहिल्यानगरच्या राहुरी तालुक्यात घडली. १५ वर्षीय मुलीचं अपहरण करून तिला ५ दिवस जंगलात ठेवले आणि आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळत पीडित मुलीची सुटका केली. या घटनेमुळे अहिल्यानगर हादरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १३ फेब्रुवारी रोजी राहुरी पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीच्या अपहरणाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी तपासाची चक्रे फिरवत आरोपींना अटक केली. ५ दिवसांनंतर नाशिक–सुरत रोडजवळ रामशेज किल्ला परिसरातील जंगलातून मुलीची सुटका करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांकडून मुख्य आरोपीसह तिघांना अटक करण्यात आली आहे.

१३ फेब्रुवारी रोजी कॉलेजला जाते असं सांगून घराबाहेर पडलेली १५ वर्षीय मुलगी घरी परत आलीच नाही. पालकांनी तात्काळ राहुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनेचा गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तपास सुरू केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन ट्रॅकिंग आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची सूत्रं वेगाने हलवली. नाशिक जिल्ह्यातील जंगल परिसरातून मुलीची सुटका करण्यात पोलिसांना यश मिळालं.

या प्रकरणात मुख्य आरोपीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्यांना अटक केली. पीडितेच्या जबाबानुसार पॉक्सो आणि लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास राहुरी पोलिस करत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ संबंधित मुलीच्या गावात बंद ठेवण्यात आला होता. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles