Sunday, November 2, 2025

Ahilyanagar crime news: प्रेयसीला भेटायला गेलेल्या प्रियकराचा प्रेयसीच्या नातेवाईकातून खून

प्रेयसीला भेटायला गेलेल्या आणि नुकताच बारावीत उत्तीर्ण झालेल्या नवनाथ तुकाराम पडवळे (वय १९) रा. पांगरी या तरुणाचा प्रेयसीच्या नातेवाईकाने लाकडी दांडक्याने हात पाय व पाठीवर मारहाण करत जिवे मारून टाकल्याची घटना पळसुंदे येथे घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

याबाबत मयत नवनाथ पडवळे याचे वडिल तुकाराम भावका पडवळे (वय ४८)रा.पांगरी यांनी अकोले पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, मुलगा नवनाथ हा मॉर्डन हायस्कुल अकोले येथे इयत्ता बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. मुलगा नवनाथ याची पळसुंदे येथील योगेश यशवंत दुटे यांची भाची हिच्या सोबत प्रेम प्रकरण चालु असल्याचे मला दोन महिन्यापुर्वी समजले होते. तेंव्हा मी त्याला तु शाळा शिक दुसरे काही करु नको असे समजावुन सांगितले होते. त्यानंतर( दि.५) रोजी माझे मेव्हणे भागा महादु दिघे यांच्या मुलाचा साखरपुडा व हळदीचा कार्यक्रम नागमळा सातेवाडी येथे असल्याने आम्ही सर्वजण कार्यक्रमाला गेलो होतो.

यावेळी हळदीचा कार्यक्रम संपल्यानंतर मुलगा नवनाथ मला म्हणाला की, मी आपल्या घरी जातो मला मोटार सायकल द्या, तुम्ही व आई येथेच मुक्कामी थांबा असे सांगून रात्री अकरा वाजल्याच्या दरम्यान निघून गेला. त्यानंतर तो दि. ५ व ६ रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास त्याचे प्रेम संबंध असलेल्या मुलीस भेटण्यास पळसुंदे येथे गेला. तिथे त्याला तिचा नातेवाईक योगेश यशवंत दुटे याने पाहिले व मुलगा नवनाथ याला पकडुन त्याला लाकडी दांडक्याने जबर मारहाण करुन त्याचा खुन केला.

फिर्यादीवरुन अकोले पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास पो.नि. मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि संदिप हजारे करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles